Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरेंनी 30 सेकंदात एकनाथ शिंदेंना गुंडाळलं, वाचा कोणत्या मुद्यावर किती वेळ बोलले मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख पदाबाबत बोलताना त्यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन करत तुम्हाला मी नको असेन तर मी पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे असंही त्यांनी ठामपणे सांगितले. पक्ष, पक्षप्रमुख, शिवसैनिक याविषयी त्यांनी 1 मिनिट 30 सेकंदात शिवसेनावषयीही सांगत शिवसैनिकांनाच आवाहन केले.

Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरेंनी 30 सेकंदात एकनाथ शिंदेंना गुंडाळलं, वाचा कोणत्या मुद्यावर किती वेळ बोलले मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 9:55 PM

मुंबईः विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाराजीनाट्यमुळे राज्यातील राजकारणाचे समीकरणं बदल आहेत असं वाटत असतानाच विनम्रतेच्या सुरात संवाद साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी फेसबूक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून 18 मिनिटांमध्येच विरोधकांची मनं जिंकून घेतली. ज्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरें ज्या मुख्यमंत्री पदासाठी सगळे ठाकरे वेठीस धरले त्या त्यांच्या काही प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या विनम्रतेच्या सुरात त्यांच्या फक्त 30 सेकंदामध्ये गुंडाळलं. त्यांच्या भाषणाच्या शैलीने आणि मांडलेल्या मुद्यांनी विरोधकांनाही त्यांच्या भल्याची कदर करावी लागली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 18 मिनिटेच संवाद साधला मात्र त्यांनी संवाद साधत असताना बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते अगदी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या, सांगण्यात येणाऱ्या प्रतिक्रियांविषयी त्यांनी सांगितले.

कोविड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह येणार असं जाहीर होताच त्यांच्या ऑनलाईन भाषणाकडे राज्यातील नागरिकांसह विरोधकांनाही त्यांच्या भाषणाची उत्सुकता होती. मुख्यमंत्री ज्यावेळी फेसबुक लाईव्ह आले त्यावेळी बोलायला सुरूवता करतानाच त्यांनी ज्याकाळात त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले आणि त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे काय झाले होते. ते सांगतच त्यांनी कोरोनावर बोलण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांनी आपल्या वाट्याल कोविड कसा आहे हे सांगत ते देशातील टॉपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये कसे गणले गेले याविषयी त्यांनी सांगितले. कोविडविषयी बोलताना त्यांनी 1 मिनिट 30 सेकंद बोलताना त्यांनी राज्यापासून ते अगदी देशपातळीवर कसं गौरवलं गेलं त्याविषयीही सांगितले.

प्रशासन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाविषयी सांगताना आपल्याला प्रशासनाविषयी, महानगरपालिका, महापौर आणि प्रशासनाचा कोणताही अनुभव नसतानाही या अडीच वर्षात प्रशासनानेही कशी साथ दिली हेही त्यांनी यावेळी सांगितले. 1 मिनिटे 30 सेकंद एवढा वेळ ज्या प्रशासनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते त्यामध्ये त्यांनी प्रशासनानेही आपल्याला कोणताही अनुभव नसताना सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री भेट

विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यापासून ज्या नाराजी नाट्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्याला एक कारण देण्यात येत होते. ते म्हणेज मुख्यमंत्री भेट देत नाहीत. अगदी कालपर्यंतही ज्यावेळी मागील आठवड्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांच्या केबिनबाहेर थांबावे लागले होते, तेव्हा पर्यंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीविषयी बोलण्यात येत होते. त्याविषयावर उद्धव ठाकरे यांनी बोलताना प्रारंभीलाच त्यांनी भेट का घेत नव्हतो, आणि तो भेट घेत नव्हतो या एकनाथ शिंदे यांच्या मुद्यावर बोलताना त्यांनी होय मी भेट घेत नव्हतो असं सांगत त्यांनी आपली शस्त्रक्रिया झाल्यामुळे भेटता येत नव्हते असंही त्यांनी मान्य केलं. याविषयावरही त्यांना अगदी 1 मिनिटे 30 सेकंद एवढाच वेळ घेत आपण आजारातून बरे झाल्यावर भेटी घ्यायला सुरूवात केल्याचेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे

विधान परिषदेच्या निकालानंतर ज्या एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते, मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले त्या एकनाथ शिंदे यांच्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दीर्घकाळ बोलतील असं अनेकांना वाटत असतानाच उद्धव ठाकरे यांनी मात्र एकनाथ शिंदे हा विषय आपल्या भाषणात 30 सेकंद एवढाच वेळ त्यांच्यासाठी देण्यात आला. मात्र या तीस सेकंदात मात्र उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरही दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्यांनी आपली झालेली शस्त्रक्रिया, डॉक्टरांनी सांगितलेले नियम आणि त्यानंतर चालू केलेल्या भेटीविषयीही त्यांनी सांगितले. भेटीगाठीविषयी सांगत असतानाच एकनाथ शिंदे यांना मात्र त्यांनी 30 सेकंदात गुंडाळले. यावेळी त्यांना आयोध्या दौऱ्याची आठवण करून देत

बाळासाहेब आणि हिंदुत्व

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह येत ज्यावेळी आपल्या भाषणाद्वारे बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व, कोरोना याविषयी मुद्दे मांडले गेले. त्यावेळी त्यांनी ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असा सवाल ज्यावेळी उपस्थित केला त्यांनाही त्यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी कदाचित पहिला मुखय्मंत्री असेल. आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही असं काही लोक भासवत आहेत. मी काय नेमकं वेगळं केलं की बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. बाळासाहेब गेल्यानंतर 2014 मध्ये एकाकी लढलो. असं सांगत त्यांनी 1 मिनिट 20 सेकंदात त्यांनी हे मुद्दे मांडले.

बंडखोर आमदार

ज्या बंडखोर आमदारांमुळे उद्धव ठाकरेंना राजकीय अस्थिर व्हावं लागलं त्यांच्याविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा विषय 2 मिनिटं 30 सेकंदात मांडून बंडखोर आमदारांची सगळी पोलखोल केली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचे आमदारा गायब सुरताला गेले, गुवाहाटीला गेले. त्यात मला पडायचंच नाही. असं बोलत त्यांनी परवा झालेल्या निवडणुकीविषयी बोलताना हॉटेलमधील थांबलेल्या आमदारांविषयी सांगितले. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, आपल्या माणसांना एकत्रं ठेवावं लागतं, अरे हा कोठे गेला तो कुठे गेला. त्यावर शंका घेतली जात होती. लघवीला गेला तरी शंका घेतो ती शंका म्हणजे लघुशंका असे म्हणत या गोष्टीचा त्यांनी मला काहीच अनुभव नव्हता. पण जे काही घडलं. मी जिद्दीने काम करणारा माणूस आहे. मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणारचं म्हणून रगणागणात उतरलो असल्याचे सांगितले.

शरद पवार, सोनिया गांधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे गेल्या अडीच वर्षात अडचणीत आलो असं सांगत होते. त्या काँग्रेस-राष्ट्रवादीविषयी आणि शरद पवार, सोनिया गांधी यांच्याविषयी त्यांनी 3 मिनिटांमध्ये त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या विचापूसबद्दलही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याविषयी बोलतान त्यांनी हेही सांगितले की, मला दुख कशाचं झालं तर आपल्याच माणसांना मी नको आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकवेळ म्हटले असते तरी चालले असते मात्र माझ्याच सैनिकांना मी का नको आहे मला कळालं नाही. मला तुम्ही समोर येऊन सांगितला असता तुम्ही मुख्यमंत्र म्हणून नालायक आहात, तुम्ही नको आहात असं सांगितला असता तरी मला चाललं असते असं सांगत त्यानी तुम्हाला मुख्यमंत्री पदी नको आहे तर मी मुख्यमंत्रीपद घेणार नाही असं सांगत त्यानी तीन मिनिटामध्येच त्यांनी यावर आपले मत व्यक्त केले.

शिवसेना हायजॅक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अठरा मिनिटांच्या भाषणात शिवसेना हायजॅकवर आपले मत मांडले. आजच्या त्यांच्या भाषणात भावनिकतेचे मुद्दे होते. शिवसेना हायजॅकवर त्यांनी आपल्या भाषणात तीन मिनिचाटा वेळ देत शिवसेना, शिवसैनिक आणि शिवसेनेची वाढ, त्याचा संघर्षही त्यांनी आपल्या भाषणात मुद्देसुदपणे मांडत शांत आणि मृदू भाषेत त्यांनी सगळ्याचा समाचार घेतला.

पक्षप्रमुखपद सोडणार

उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख पदाबाबत बोलताना त्यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन करत तुम्हाला मी नको असेन तर मी पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे असंही त्यांनी ठामपणे सांगितले. पक्ष, पक्षप्रमुख, शिवसैनिक याविषयी त्यांनी 1 मिनिट 30 सेकंदात शिवसेनावषयीही सांगत शिवसैनिकांनाच आवाहन केले. यावेळी त्यांनी मी शिवसैनिकांना बांधिल असल्याचेही त्यांनी सांगितले.

सत्तेच संख्याबळ

सत्ता आणि सत्तांतराविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राजकीय मुद्याला भावनिकतेची जोड देत मला अशी संख्याबळाची आशा नाही आणि या पदाचीही आशा नाही असं सांगत तुम्ही म्हणत असाल तर मी आता राजीनामा देऊन मी वर्षा निवासस्थानही सोडायला तयार आहे असं सांगितले. यावेळी त्यांनी पद येतात आणि जात असतात असं सांगत त्यांनी आयुष्याची कमाई काय तुम्ही जे काही काम करता तिच खरी कमाई आहे हे ही सांगितले. त्यातून जनतेची जी प्रतिक्रिया असते ती खरी कमाई असते. या अडीच वर्षात जे तुम्ही मला प्रेम दिलं. कुठे झाली हो आपली भेट असं म्हणत त्यांनी 1 मिनिट 30 सेकंदात शेवटी ही लोकशाही आहे. ज्याच्याकडे संख्या अधिक तो जिंकतो, पण ती संख्या तुम्ही कशी जमवता प्रेमाने जमवता, जोरजबरदस्तीने की दटावण्या देऊन जमवता हे नगण्य असतं. असंही त्यांनी सांगितले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.