Uddhav Thackeray : लग्नाच्या प्रमाणपत्र जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचा फोटो, प्रसाद लाड यांनी ट्विट करत बीएमसीला विचारला जाब

प्रसाद लाड यांनी ट्विट केलेल्या या फोटोमधील जाहिरातीत थेट उद्धव ठाकरेंचा फोटो दिसतोय आणि ही जाहिरात आहे लग्नाच्या प्रमाणपत्राची, त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर ही जाहिरात तुफान वायरल होतेय.

Uddhav Thackeray : लग्नाच्या प्रमाणपत्र जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचा फोटो, प्रसाद लाड यांनी ट्विट करत बीएमसीला विचारला जाब
लग्नाच्या प्रमाणपत्र जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचा फोटो, प्रसाद लाड यांनी ट्विट करत बीएमसीला विचारला जाबImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 9:06 PM

मुंबई : आधी एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचं बंड, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावरून वाढलेला वाद, त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत आणि या मुलाखतीनंतर भाजप नेते आणि बंडखोर शिवसेना आमदारांकडून होणारे पलटवार राज्यातली जनता पहातेच आहे. मात्र अशातच आता बीएमसीने (BMC) एन्ट्री मारली आहे. बीएमसीची एक जाहिरात सध्या प्रचंड वायरल होत आहे. ही जाहिरात भाजप नेते प्रसाद लाड यांनी ट्विट करत बीएमसीला काही खोचक सवाल विचारले आहेत. आता तुम्ही म्हणाल या जाहिरातीत एवढं काय विशेष आहे,  प्रसाद लाड यांनी ट्विट केलेल्या या फोटोमधील जाहिरातीत थेट उद्धव ठाकरेंचा फोटो दिसतोय आणि ही जाहिरात आहे लग्नाच्या प्रमाणपत्राची, त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर ही जाहिरात तुफान वायरल होतेय.

कोणत्या हुद्द्याखाली फोटो लावला?

यावर प्रसाद लाड यांनी ट्विट करत, बीएमसीच्या जाहिरातवर मा. उद्धव ठाकरे यांचा फोटो कोणत्या हुद्द्याखाली लावला? याचं उत्तर महापालिका आयुक्त व प्रशासनाने दिले पाहिजे. BMC कोणाचीही जहागीर नसून, मुंबईकरांसाठी काम करणारी ही प्रशासकीय संरचना आहे. यावर नेत्याचा फोटो कोणत्या अधिकाराने लावला? याचे उत्तर मुंबईकरांना हवे आहे. असे ट्विट भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलं आहे.

प्रसाद लाड यांचा थेट सवाल

फोटोवरून वाद वाढणार?

या जाहिरातीकडे नीट बारकाईने पाहिल्यास ही जाहिरात काही दिवसांपूर्वीची असल्याचे जाणवत आहे. तसेच हा फोटोही काहीसा जुना दिसत आहे. असेही असू शकतं की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी असतानाची ही जाहिरात असू शकते. मात्र सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणतेही घटनात्मक पद नाहीये. त्यामुळेच आता भाजपनेते याच जाहिरातीवरून सवाल करत आहेत. प्रत्येक जाहिरातीवर दिसणाऱ्या मोदींच्या फोटोवरून आजपर्यंत भाजपवर टीका होत आली आहे. त्यामुळे आता या फोटोवरून शिवसेनेवर टीका करण्याची संधी भाजपला चालून आली आहे. आता बीएमसी या प्रकरणावर काही स्पष्टीकरण देणार का? हेही पाहण तितकेच महत्वाचं ठरणार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.