न्यायामूर्ती आरोपीला भेटतात… राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे भेटीवर उद्धव ठाकरे यांचा घणाघात

uddhav thackeray on rahul narvekar | शिवसेनासंदर्भात बुधवारचा दिवस महत्वाचा आहे. एकनाथ शिंदे गट की उद्धव ठाकरे गट यापैकी कोणाचे आमदार अपात्र ठरणार? त्याचा निकाल येणार आहे. या निकालाच्या पूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर प्रश्न उपस्थित केले.

न्यायामूर्ती आरोपीला भेटतात... राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे भेटीवर उद्धव ठाकरे यांचा घणाघात
uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 1:20 PM

मुंबई, दि. 9 जानेवारी 2024 | शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकाल बुधवारी येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. या निकालापूर्वी लवाद म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी झाली. या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला आहे. दोन वेळा झालेली ही भेट म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात हे निर्देशनास आणून दिले आहे. आम्ही कालच यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. परंतु जनतेच्या न्यायालयातही ही लक्षात आणून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. उद्या वेडावाकडा निकाल आला तर…या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

सर्वोच्च न्यायालयच्या निर्देशनास आणले

लवादाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या रात्रीपर्यंत निकालासाठी वेळ घेतील. कदाचित त्यापेक्षा जास्त वेळ ते काढतील. ते लवाद म्हणून बसले आहेत. परंतु दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटले. हा प्रकार म्हणजे न्यायामूर्ती आरोपींना जाऊन भेटण्यासारखा हा प्रकार आहे. आम्ही काल ताबडतोब हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्दशनास ही बाब लक्षात आणून दिली आहे. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. न्यायामूर्तीच्या भूमिकेत नार्वेकर आहेत आणि आरोपी असलेले एकनाथ शिंदे त्यांना भेटले आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे आमच्या दृष्टीने ते आरोपी आहेत. खटला सुरु असताना आरोपी आणि न्यायामूर्ती यांची उघड उघड भेट होत आहेत. हा लोकशाहीचा खून होत आहे. आमची अपेक्षा आता सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. परंतु जनतेच्या न्यायालयात ही बाब आम्ही लक्षात आणून देऊ इच्छता.

हे सुद्धा वाचा

उल्हास बापट म्हणाले…

उद्धव ठाकरे म्हणाले की, एका मुलाखतीत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात, ‘हा वेळ काढूपणा आहे किंवा अध्यक्षांवर दबाब असेल किंवा ते या प्रकरणात इतके कार्यक्षम नसतील. दोन महिन्यात लागणाऱ्या निकालासाठी त्यांनी दोन वर्ष घेतले.’ राज्यातील जनतेच्या लक्षात ही बाब आम्ही आणून देऊ इच्छितो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.