बॅक टू पॅव्हेलियन या, फडणवीसांना मुख्यमंत्री करा; रामदास आठवलेंची उद्धव ठाकरेंना साद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मोदींशी बंद दाराआडही चर्चा केली. रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोदी-ठाकरे भेटीवर मोठं विधान केलं आहे.

बॅक टू पॅव्हेलियन या, फडणवीसांना मुख्यमंत्री करा; रामदास आठवलेंची उद्धव ठाकरेंना साद
Ramdas Athawale
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 3:13 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मोदींशी बंद दाराआडही चर्चा केली. रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोदी-ठाकरे भेटीवर मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बॅक टू पॅव्हेलियन यावं. भाजपसोबत सत्ता स्थापन करावी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, अशी सादच रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना घातली आहे. (Uddhav Thackeray should join hands with BJP again: Ramdas Athawale)

रामदास आठवले यांनी ‘टिव्ही9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरेंना माझा प्रस्ताव आहे. त्यांनी बॅक टू पव्हेलियन यावं. भाजपसोबत सरकार स्थापन करावं. शिवसेना, भाजप आणि आरपीआयची युती महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारी आहे, असं आठवले म्हणाले.

30 वर्षाच्या मैत्रीचा विचार करा

शिवसेना आणि भाजपची 30 वर्षांपासूनची मैत्री होती. उद्धव ठाकरे यांनी या मैत्रीचा विचार करावा. भाजपसोबत यावं आणि मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची काल भेट झाली. या भेटीमधून राज्याला बऱ्याच अपेक्षा आहेत, असं ते म्हणाले.

पवारांना भेटले

दरम्यान, आठवले यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी रिपाइं नेते अविनाश महातेकरही त्यांच्यासोबत होते. ही अनौपचारिक भेट होती. या भेटीत मराठा, ओबीसी, मुस्लिम आणि धनगर आरक्षणावर चर्चा झाली. तसेच देशभरातील क्षत्रियांनाही आरक्षण मिळावं याबाबतही चर्चा करण्यात आली. त्याशिवाय पदोन्नतीतील आरक्षणावरही चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादेची अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती करायला हवी. त्यासाठी दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, या मुद्द्यावर पवारांनी सहमती दर्शविल्याचंही त्यांनी सांगितलं. पदोन्नतीमधील आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारशी चर्चा करून अनुकूल निर्णय घेण्याचे आश्वासनही पवारांनी दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. (Uddhav Thackeray should join hands with BJP again: Ramdas Athawale)

संबंधित बातम्या:

विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं; संजय राऊतांचा टोला

VIDEO: राज्य सरकार आता पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल; अतुल भातखळकरांचा खोचक टोला

पहिल्याच पावसात मुंबईची ‘तुंबई’; मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश

(Uddhav Thackeray should join hands with BJP again: Ramdas Athawale)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.