देवेंद्र फडणवीस कोणत्या गुंगीत?, मुख्यमंत्रीपद गेल्याने भरकटले; ‘सामना’तून जोरदार टीका

कोकणात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. हे परप्रांतीय जमीनदार भाजपचे अर्थपुरवठादार म्हणजे छोटे अदानी आहेत, असा चिमटाही काढण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस कोणत्या गुंगीत?, मुख्यमंत्रीपद गेल्याने भरकटले; 'सामना'तून जोरदार टीका
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 8:05 AM

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकणात भराडी देवीच्या यात्रेला उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी कोकणात नाणार प्रकल्प आणणारच असं जाहीर केलं. त्यावरून दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. फडणवीस कोकणात भराडी देवीच्या दर्शनासाठी आले होते की कोकणचे स्मशान करणाऱ्या रिफायनरीची वकिली करण्यासाठी आले होते? असा सवाल दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

कोकणात रिफायनरी आणणारच असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असलं तरी कोकणातील जत्रेत कुस्त्यांचे फड होत नाहीत. कोणी बाहरेच्या पहेलवानाने उगाच पिचक्या मांडीवर थाप ठोकली तरी कोकणची जनता त्यास धूप घालत नाही. फडणवीस हे कोणत्या गुंगीत आहेत? मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे फडणवीस भरकटले आहेत. 2024 आधीच रेडे सरकार कोसळणार असल्याने फडणवीस थयथयाट करत आहेत, अशी टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

देवीची शपथ घेऊन सांगा

तारापूरमध्ये असाच प्रकल्प आणला. तिथे जलप्रदूषण वाढले की नाही? तिथे वारंवार भूकंपाचे धक्के बसतात की नाही? तारापुरात कर्करोगाचे प्रमाण वाढले की नाही? भराडी देवीची शपथ घेऊन सांगा, असं आव्हान देतानाच कोकणात रिफायनरी आणण्यापेक्षा गुजरातने पळवून नेलेले वेदांता फॉक्सकॉन, एअरबस, ड्रग्स पार्कसारखे प्रकल्प पुन्हा खेचून आणा, असं आव्हानच अग्रलेखातून देण्यात आले आहेत.

छोटे अदानी

कोकणात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. हे परप्रांतीय जमीनदार भाजपचे अर्थपुरवठादार म्हणजे छोटे अदानी आहेत, असा चिमटाही काढण्यात आला आहे. फडणवीस या छोटे अदानींची पाठराखण करण्याची भाषा बोलत आहेत. हे सरकार जमीनदारांची पाठराखण करत असून कोकणाच्या मुळावर उठले आहे, अशी घणाघाती टीकाही करण्यात आली आहे.

प्रकल्प करू नका हा देवीचा कौल

नाणारचा प्रकल्प करून का, असा भराडी देवीचा कौल आहे. हा कौल टाळून काही कराल तर देवीचा कोप होईल. इतके जागरूक हे देवस्थान आहे, असं सांगतानाच अदानीच्या घोटाळ्यामुळे देशांचे, बँकांचे, एलआयसीचे अजितबात नुकसान झालेली नाही अशी थाप निर्मला सीतरामण यांनी मारली. तशीच थाप नाणारबाबत देवेंद्र फडणवीस मारत असल्याची टीकाही करण्यात आली आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.