ठाकरे घराण्यात पहिल्यांदाच घडलं… उद्धव ठाकरे यांची थेट राज ठाकरेंविरोधात शपथ, काय घडलं?; टीव्ही9वर एक्स्क्लूझिव्ह मुलाखत

अनेकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येतील, अशी चर्चा होत असते. दोन्ही ठाकरे भावांनी एकत्र यावं, अशी राज्यातील बहुसंख्य मराठी जनतेची इच्छा आहे. पण दोन्ही भावांचे रक्ताचे ऋणानुबंध असले तरी मनाने दोन्ही भाऊ एकत्र अजूनही आलेले नाहीत.

ठाकरे घराण्यात पहिल्यांदाच घडलं... उद्धव ठाकरे यांची थेट राज ठाकरेंविरोधात शपथ, काय घडलं?; टीव्ही9वर एक्स्क्लूझिव्ह मुलाखत
ठाकरे घराण्यात पहिल्यांदाच घडलं... उद्धव ठाकरे यांची थेट राज ठाकरेंविरोधात शपथ
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 3:54 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आज समोर येत आहे. ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू राहिलेलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी ओळख होती. त्यांचा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात प्रभाव होता. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे हे देखील बाळासाहेबांच्या राजकारणाचा वारसा पुढे नेत आहेत. पण यावेळी परिस्थिती फार वेगळी आहे. एकेकाळी एकाच पक्षात काम करणारे दोन भाऊ आज वेगवेगळे आणि टोकाच्या विरोधात आहेत. अर्थात बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापन करत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. अनेकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येतील, अशी चर्चा होत राहिली. दोन्ही ठाकरे भावांनी एकत्र यावं, अशी राज्यातील बहुसंख्य मराठी जनतेची इच्छा आहे. पण दोन्ही भावांचे रक्ताचे ऋणानुबंध असले तरी मनाने दोन्ही भाऊ एकत्र अजूनही आलेले नाहीत.

विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी माहीम येथे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या प्रचारानिमित्त घेतलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी वरळीतून उमेदवारी लढवत होते. त्यावेळी कुटुंब म्हणून आपण आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, असं राज ठाकरे म्हणाले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी शपथ घेतली. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उद्धव ठाकरे शपथ घेताना दिसले. या मुलाखतीचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याविरोधात शपथ घेताना दिसत आहे.

उद्धव ठाकरेंनी घेतली शिवरायांची शपथ

मुलाखतीच्या प्रोमोत टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत उद्धव ठाकरे यांना माहीम विधानसभेबाबत प्रश्न विचारतात. माहीममध्ये अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. याबाबत उमेश कुमावत प्रश्न विचारतात. त्यावर उद्धव ठाकरे भूमिका मांडताना दिसतात. “जे महाराष्ट्राचे लुटारु आहेत, ज्याचा ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शपथ घेतात की मी दाखवणार नाही बोलतात”, असं उद्धव ठाकरे प्रोमोत बोलताना दिसत आहेत. तसेच “मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतो”, असंही उद्धव ठाकरे प्रोमोत बोलताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

मुलाखत कधी, कुठे आणि कशी पाहता येणार?

ही मुलाखत आज संध्याकाळी 5 वाजता टीव्ही 9 मराठी वाहिनीवर लाईव्ह दिसणार आहे. तसेच आमच्या टीव्ही 9 मराठीच्या युट्यूब चॅनलवरही ही मुलाखत आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.