मशाल चिन्ह आणि पक्षाचं नाव फक्त पुण्याच्या पोटनिडणुकीपर्यंतच वापरता येणार, कारण काय?; ठाकरे गटाचं टेन्शन वाढणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह तात्पुरतं दिलं होतं. 26 फेब्रुवारीपर्यंतच हे नाव वापरण्याची मुदत ठाकरे गटाला देण्यात आली आहे.

मशाल चिन्ह आणि पक्षाचं नाव फक्त पुण्याच्या पोटनिडणुकीपर्यंतच वापरता येणार, कारण काय?; ठाकरे गटाचं टेन्शन वाढणार?
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 12:45 PM

मुंबई : ठाकरे गटाला टेन्शन देणारी आणखी एक बातमी आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे. 26 फेब्रुवारीपर्यंतच या चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरण्याची मुदत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला 26 फेब्रुवारीनंतर हे चिन्ह वापरता येणार नाही. तशी ऑर्डरच निवडणूक आयोगाने काढली आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्ये खळबळ उडाली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह तात्पुरतं दिलं होतं. 26 फेब्रुवारीपर्यंतच हे नाव वापरण्याची मुदत ठाकरे गटाला देण्यात आली आहे. म्हणजे चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपर्यंतच ठाकरे गटाला पक्षाचं हे नाव आणि चिन्ह वापरता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर त्यांना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. हे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी किंवा नवीन नाव आणि चिन्ह घेण्यासाठी ठाकरे गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावं लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

म्हणून नवं चिन्ह दिलं

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर हक्क सांगितला होता. त्यानंतर निवडणूक निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे नाव दिलं होतं.

तर ठाकरे गटाच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं होतं. शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं होतं.

तर शिंदे गटाचे चिन्ह गोठवलं जाईल

काल निवडणूक आयोगाचा शिंदे आणि ठाकरे गटातील वादावर निर्णय आला होता. यावेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव वापरण्याची परवानगी दिली. त्यामुळे आता ठाकरे गटाला 26 फेब्रुवारीनंतर निवडणूक आयोगाने दिलेलं मशाल चिन्ह वापरता येणार नाही.

ठाकरे गट सोमवारी कोर्टात गेल्यास शिंदे गटाला मिळालेलं धनुष्यबाण चिन्हं गोठवलं जाण्याची शक्यता आहे, असं ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलं.

आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.