Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंमत असेल तर मणीपूरमध्ये जाऊन दाखवा, उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदी यांना आव्हान

मणीपूर पेटला. तिथं काय केलं अमित शाह यांनी. विश्वगुरू अमेरिकेत तुम्ही तुमचं ज्ञान पाजळणार. मणीपूर पेटलेले राज्य आहे. तुम्ही अमेरिकेला जाता. मणीपूर शांत करून दाखवावं.

हिंमत असेल तर मणीपूरमध्ये जाऊन दाखवा, उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदी यांना आव्हान
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 5:15 PM

मुंबई : वरळी येथील ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्यासारखे लढवय्ये साथी दिले. हे माझे भाग्य आहे. जीवाला जीव देणारे सोबती विकत घेता येत नाही. तुमचे ऋण कसं फेडायचे. ऋण फेडण्यासाठी माझ्याकडे काही नाही. पक्षाचे नाव आणि चिन्हही नाही. लाचार मिंध्ये पलीकडे गेले. माझ्याकडे काही नसताना तुम्ही सोबत आहात. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिनं. त्यानंतर आपल्या लोकांनी केलेल्या गद्दारीला एक वर्ष परवा होईल, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

जे जे सोबत आहेत ते म्हणतात. उद्धवजी आम्ही तुमच्या सोबत आहोत. जे गेले त्यांना जाऊ द्या. जे सुखात साथ देतात त्यांना नाते म्हणतात. जे दुःखात साथ देतात त्यांना फरिस्ते, देवदूत म्हणतात. तुम्ही सोबत असल्यावर कितीही शाह आणि अफजलखान आलेत तर मला पर्वा नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं.

सत्तेची मस्ती हा फुगलेला फुगा

उद्धव ठाकरे म्हणाले, मला संताप एका गोष्टीचा येतो. आपल्या घरात येऊन दमदाटी करतात. फोडाफोडी करतात. आम्ही नामर्दाची औलाद नाहीत. सत्तेची मस्ती हा फुगलेला फुगा आहे. हा फुगा फोडायला वेळ लागला. मस्ती मणीपूरमध्ये जा आणि दाखवा. तिथं लोकं ईडी, सीबीआय यांना विचारत नाही. मणीपूर पेटला. तिथं काय केलं अमित शाह यांनी. विश्वगुरू अमेरिकेत तुम्ही तुमचं ज्ञान पाजळणार. मणीपूर पेटलेले राज्य आहे. तुम्ही अमेरिकेला जाता. मणीपूर शांत करून दाखवावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणीपूरमध्ये जाऊन दाखवावं, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

हे सुद्धा वाचा

महिला गुंड तयार झाल्यात

अन्यायाविरोधात मनामध्ये आग पेटायला पाहिले. कुणावरती हात उचलू नका, असे बाळासाहेब ठाकरे सांगायचे. पण,तुमच्यावर हात उगावलं तर त्यांना जागेवर ठेवू नका. युवती सेनेच्या अयोध्या पौळ यांना मंचावर बोलावलं होतं. काल शाईफेक झाली. महिला गुंड तयार झालेत. यापुढं महिलांवर हात उठला तर हात जागेवर ठेवू नका. अन्याय आम्ही करणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

उठसूट लुटालूट

राज्यात सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, हे सरकार कसं चाललंय. उठसुठ लुटालूट. मुंबई तोडू शकत नाही. जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा प्रयत्न करेल. तो कोणीही असला तरी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.

नितीश कुमार यांची भेट घेणार

२३ तारखेला बिहारला जात आहे. नितीश कुमार घरी आले होते. पूर्वी मातोश्रीमध्ये भाजपचे लोकं यायचे. भाजपशिवाय इतर लोकं येतात. सुखातले सोबती पाहिजे. उद्या सत्तेवर नसाल तेव्हा तुम्हाला विचारणारे कुणी येणार असा इशारा त्यांनी भाजपला दिला. विरोधी पक्षाची युती होणार का, असा प्रश्न विचारले जातात. होणारी एकजूट ही देशप्रेमींची एकजूट होणार आहे. स्वातंत्र्य प्रेमींची एकजूट होणार आहे. ज्या कुणाला भारतामाता स्वतंत्र हवी असेल त्यांनी एकत्र यावे. भाजपच्या जोखडापासून सोडवावे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....