Uddhav Thackery : हा कडकडीत बंद कशासाठी, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली भूमिका, सरकारच्या भूमिकेचा घेतला खरपूस समाचार, अत्यावश्यक सेवेबद्दल केले मोठे आवाहन

Maharashatra Bandha : महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्रात बंदची हाक दिली आहे. हा कडकडीत बंद कशासाठी याविषयी उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. महायुती सरकारने किती आणि कोणतेही आरोप केले तरी बंद कशासाठी करत आहोत, याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

Uddhav Thackery : हा कडकडीत बंद कशासाठी, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली भूमिका, सरकारच्या भूमिकेचा घेतला खरपूस समाचार, अत्यावश्यक सेवेबद्दल केले मोठे आवाहन
उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्र बंदची हाक
Follow us
| Updated on: Aug 23, 2024 | 12:32 PM

महाविकास आघाडीने शनिवारी, 24 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यावर महायुती सरकारने टीका केली आहे. बदलापूर अत्याचार घटनेच्या आड महाविकास आघाडी ही राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी हा बंद कशासाठी करण्यात आला याची माहिती दिली आहे. त्यांनी यावेळी सरकारच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. या घटनेची जनतेच्या न्यायालयाने दखल घेतली आहे, हे उद्या दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले. आज त्यांनी मुंबईत याविषयी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

हा बंद कशासाठी?

कालचाच विषय आहे. एकूणच राज्यात जी अस्वस्थता आहे, तोच विषय आहे. मी तुमच्यामाध्यमातून जनतेशी बोलत आहे. राजकीय कारणासाठी बंद नाही. विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद आहे. पालकांना असं वाटतं की मुलगी शाळेत सुरक्षित राहील का. कार्यालये असतील, रुग्णालये असतील तिथे आपण सुरक्षित राहू का असं माता भगिनींना वाटतकं. या अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी बंद आहे. आम्ही विरोधी आहोत. विकृतीच्या विरोधात आम्ही बंद पुकारत आहोत. आजपर्यंत जसा बंद झाला, तसाच बंद असेल. सर्व नागरिकांचा बंद असेल. जात पात धर्माचा भेद नसेल. याच्या कक्षा ओलांडून सर्वांनी बंदमध्ये यावं. हा सामाजिक प्रश्न आहे. आजपर्यंतच्या बंदसारखाच असेल. कडकडीत बंद असावा. पण त्यात अत्यावश्यक सेवा आहे. पेपर, अग्निशमन दल आरोग्य सेवा चालू राहतील. सणासुदीचे दिवस आहे. गणपती बाप्पा येत आहे. दहीहंडीचा सराव आहे. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळा. कारण उत्सव आहे. सरकारला काही म्हणू द्या. मी जनतेच्या वतीने बोलतो, असे ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका

हा बंद राजकीय असल्याने त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे. उद्याचा बंद हा बेकायदेशीर असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.  त्याविषयी माध्यमांनी प्रश्न विचारालं, तेव्हा सदावर्तेंचे नाव न घेता, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. महिलांवरील अत्याचाराविरोधात हा बंद असल्याची भूमिका त्यांनी ठोसपणे सांगितले.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.