उल्हासनगर मच्छी मार्केटवर पालिकेची धडक कारवाई, गळ्यावर सुरा ठेवून विक्रेत्याचा विरोध
गळ्यावर सुरा ठेवून अतिक्रमण कारवाईला विरोध करण्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरात घडला.
उल्हासनगर : गळ्यावर सुरा ठेवून अतिक्रमण कारवाईला विरोध करण्याचा धक्कादायक (Ulhasnagar Fish Market) प्रकार उल्हासनगरात घडला. उल्हासनगर मच्छी मार्केटवर आज पालिकेने धडक कारवाई केली. तेव्हा एका मच्छी विक्रेत्याने गळ्यावर सुरा ठेवत या कारवाईला विरोध केला (Ulhasnagar Fish Market).
उल्हासनगर कॅम्प नंबर 5 च्या मठमंदिर भागातील मच्छी मार्केटवर आज महापालिकेने धडक कारवाई केली. मात्र, महापालिकेने कोणतीही नोटीस न देता ही कारवाई केल्याने मच्छी विक्रेत्यांनी त्याला विरोध केला.
या दरम्यान, एका मच्छी विक्रेत्याने पोलीस आणि पालिका अधिकारऱ्यांसोबत बाचाबाची होताच धावत जाऊन दुकानातील सुरा घेतला आणि आपल्या गळ्यावर ठेवला. त्यामुळे इथले वातावरणात तापले होते. पालिकेने आधी नोटीस द्यावी मगच कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, या दुकानदारांनी पत्र्याचे शेड काढल्यानंतर आणि सगळ्या गोंधळामुळे पालिकेचे अधिकारी कारवाई न करता पुन्हा माघारी फिरले.
रात्री अंधारात मासे पकडण्यासाठी नदीवर, काका-पुतण्याचा बुडून मृत्यूhttps://t.co/AUeHbsCQnt #Ahmadnager
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2020
Ulhasnagar Fish Market
संबंधित बातम्या :
उल्हासनगर कोरोनाचा हॉटस्पॉट, वृद्ध महिलेच्या संपर्कातील 12 जण पॉझिटिव्ह