गँगस्टर अबू सालेम याचा पुतण्या पानटपरीवर ऐटीत उभा होता, पोलीस आले आणि उचलून नेलं; कुठून आले? कुठे घेऊन जाणार?
अतिक अहमद आणि अशरफ या दोन गुंडांची हत्या झाल्यानंतर यूपी पोलिसांनी उत्तर प्रदेशात साफसफाई सुरू केली आहे. गुंडांच्या अड्डयावर छापेमारी करत त्यांना पकडण्यात येत आहे. उलटा गोळीबार करणाऱ्यांचं एन्काऊंटर केलं जात आहे.
मुंबई : उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबईत येऊन मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी गँगस्टर अबू सालेमच्या पुतण्याला अटक केली आहे. यूपी पोलिसांनी सालेमच्या पुतण्याला वांद्रे हिल रोडवरून अटक केली आहे. आरिफ असं सालेमच्या पुतण्याचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून तो फरार होता. त्याला पकडण्यासाठी यूपी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. अखेर तो मुंबईत असल्याची टिप मिळाली अन् पोलिसांनी व्यवस्थित जाळं रचत त्याला ताब्यात घेतलं.
आरिफ मुंबईत लपून बसल्याची टिप यूपी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर यूपी पोलिसांनी त्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्याच दरम्यान आरिफला पकडण्यासाठी यूपी पोलिसांची एक टीम मुंबईत आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी यूपी पोलिसांना आरिफची सर्व माहिती दिली. त्यातून आरिफ वांद्रे येथील एका हॉटेलजवळी पानाच्या टपरीवर उभा असल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्या हॉटेलच्या दिशेने धाव घेतली.
साध्या वेशात पोलीस
पोलिसांची एक टीम तात्काळ त्या हॉटेलजवळ पोहोचली. तिथं आरिफ रस्त्याच्या कडेला उभा असल्याचं पोालिसांना दिसला. पोलीस आपल्याला पकडायला आलीय याचा आरिफला संशय येऊ नये म्हणून पोलीस पानटपरीवर साध्या वेशात पोहोचली. पोलीस आरिफला पकडत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. आरिफ पान टपरीजवळ उभा असल्याचं या व्हिडीओत दिसतं. त्या ठिकाणी आधीच काही लोक हजर असल्याचं दिसतं. त्यानंतर पोलीस लगेच तिथे गेले आणि त्यांनी आरिफला पकडून घेऊन गेले. व्हिडीओत हा सर्व प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे.
छापेमारी सुरू
अतिक अहमद आणि अशरफ या दोन गुंडांची हत्या झाल्यानंतर यूपी पोलिसांनी फरार आरोपींना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. अनेक ठिकाणी छापेमारी करून गुंडांना ताब्यात घेतलं जात आहे. तर पोलिसांच्या या कारवाईला उत्तर म्हणून गुंडांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस अशा गुंडांचा खातमाही करत आहे. आज यूपी पोलिसांनी हिस्ट्रीशीटर आरोपी दीपूलाही अटक केली आहे. त्याच्यावर 50 हजाराचं बक्षीस होतं. पोलीस दीपूला पकडण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याने स्वत:वर गोळ्या झाडल्या. त्याच्या पायाला गोळी लागली. त्यामुळे पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं असल्याचं सांगितलं जात आहे.