मुंबईकरांची तहान भागणार, अप्पर वैतरणा धरणातून 50 लाख क्युबिक लिटर पाणी सोडले
मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा धरणातून 50 दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडल्याची माहिती (Upper Vaitarna dam water released for Mumbai) दिली.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार (Upper Vaitarna dam water released for Mumbai) होती. मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा धरणातून 50 दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडल्याची माहिती दिली. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढावणार नाही.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार, मुंबईला पाणी पुरवणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी अप्पर वैतरणा धरणातून सोडण्यात आले आहे. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही.@mybmc
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 3, 2020
मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा धरणातून 50 दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे.
मुंबईची लोकसंख्या पाहता मुंबईला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करावा लागतो. झोपडपट्टी भागात अनेकदा पाणी मिळत नाही किंवा कमी दाबाने पाणी मिळते. मात्र वैतरणा धरणातून 50 दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडले आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळला (Upper Vaitarna dam water released for Mumbai) आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईकरांसाठी खूशखबर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो
पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद