मुंबई: शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही. पण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप किंवा टीका केली तर आम्ही जन आशीर्वाद यात्रेला विरोध करणार, असा इशारा शिवसनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा हा कुणाला असतो हे कळणाऱ्याला माहीत असतं, असा सूचक विधानही नाईक यांनी केलं. तर, दुसरीकडे रत्नागिरीतून राणेंची यात्रा सुरू होत असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (vaibhav naik reaction on narayan rane’s over jan ashirwad yatra)
वैभव नाईक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना हा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. त्यासाठी हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही पण नारायण राणे यांनी जर उद्धव ठाकरेंवर आरोप किंवा टीका केली तर मात्र आम्ही यात्रेला विरोध करणार, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.
राणेंची मुले जर उद्धव ठाकरेंवर टीका करतील तर जन आशीर्वाद यात्रेला आमचा विरोध राहील. पोलीस प्रशासन आपल्या पद्धतीने काम करत आहे. राणे हे सुद्धा केंद्रीय मंत्री आहेत, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने संयम ठेवला पाहिजे. कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे. एक बाजूने संयम कधी राहणार नाही, दोन्ही बाजूने संयम ठेवला तर तो राहील, असंही ते म्हणाले.
शिवसैनिक स्वयंस्फूर्तीने सज्ज आहेत. मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा हा कोणाला असतो. तो कळणाऱ्याला माहीत असतो, असंही त्यांनी सांगितलं. तसेच प्रमोद जठार यांना खूप वर्षांनी सिंधुदुर्ग दिसला आहे. यात्रेच्या निमिताने त्यांना सिंधुदुर्ग दिसला हे बरं झालं, असा चिमटाही त्यांनी काढला.
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक फ्लेक्स शेअर केला आहे. ज्यामध्ये राणेंच्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याचा उल्लेख करण्यात आलाय. राणे आज रत्नागिरी जिल्ह्यात असतील तर पुढचे दोन दिवस सिंधुदुर्गात असतील. नितेश राणेंनी शेअर केलेल्या फ्ले्सवर देखील योद्धा पुन्हा मैदानात, असं लिहिलं आहे. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी येणाऱ्या विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा दौरा अचानक रद्द झालेला आहे. आजचा होणारा दौरा रद्द झाल्याचे प्रशासनातर्फे सुचित करण्यात आले आहे. यापाठीमागील ठोस कारण आणखी समजू शकलेलं नाही. (vaibhav naik reaction on narayan rane’s over jan ashirwad yatra)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 August 2021https://t.co/UO1rQexmHK#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 27, 2021
संबंधित बातम्या:
भाजपशी कधीच कटुता येणार नाही, आम्ही हिंदुत्वाच्या बंधनात; संजय राऊतांचं मोठं विधान
राणेंच्या घराबाहेर जाऊन ताकद दाखवली, आधी उद्धव ठाकरेंकडून शाबासकी, आता आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस
(vaibhav naik reaction on narayan rane’s over jan ashirwad yatra)