महाविकास आघाडीकडून वंचितला ‘हरणाऱ्या’ जागांचा प्रस्ताव? मविआ नेत्यांना पाठवलेल्या पत्रात मोठा दावा

जाणीवपूर्वक 'हरणाऱ्या' जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या आणि उर्वरित मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या लक्षणीय मतदारांचा पाठींबा मिळवायचा हा हेतू महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा आहे, असं कार्यकर्त्यांचं मत असल्याचं वंचितने पत्रात म्हटलं आहे.

महाविकास आघाडीकडून वंचितला 'हरणाऱ्या' जागांचा प्रस्ताव? मविआ नेत्यांना पाठवलेल्या पत्रात मोठा दावा
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 9:27 PM

मुंबई | 8 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात महाविकास आघाडीवर मोठा आरोप करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून वंचितला हरणाऱ्या जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असा धक्कादायक दावा वंचितने पत्रात केला आहे. महाविकास आघाडीकडून ज्या दोन जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे तिथे महाविकास आघाडीची ताकद कमी आहे, असा वंचितचा दावा आहे. वंचितच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हे पत्र ट्विट करण्यात आलं आहे. “वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी 6 मार्च 2024ला पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना एक महत्त्वपूर्ण पत्र लिहलं आहे. आम्हाला आशा आहे की, 9 मार्च 2024 च्या बैठकीत आपण यावर सकारात्मक चर्चा कराल. आपली युती भक्कम आणि टिकाऊ करण्याचा आमचा प्रयत्न आहे, याची आम्ही तुम्हा तिघांना खात्री देत आहोत”, असं वंचितने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

“६ मार्च, २००२४ ला फोर सिझन्स, वरळी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकी संदर्भात हे अतिशय महत्त्वाचे पत्र मी आपणा तिघांना वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने लिहित आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे हजर होते. राज्य कार्यकारिणीला मिळालेल्या माहितीवरून असे दिसून येत आहे की महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागावाटप अद्याप प्रलंबित आहे. ह्यात भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा 10 जागांवर आणि तीनही पक्षात 5 जागांवर अशा एकूण 48 पैकी 15 जागांवर निर्णय होत नाही (tie आहे) अशी परिस्थिती आहे”, असं पत्रात म्हटलं आहे.

“भाजप-आरएसएसच्या विभाजनकारी आणि लोकशाही विरोधी अजेंड्यांविरुद्ध सातत्याने ठामपणे आणि बेधडकपणे उभा असलेला आमचाच पक्ष आहे. आम्ही जागा वाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीचे दिरंगाईचे धोरण आणि अनिर्णायक दृष्टिकोनाबद्दल चिंतित आहोत. 2 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारीच्या बैठकांनंतरच्या महाविकास आघाडीच्या अंतर्गत चर्चत आम्हाला वगळले गेले. महाविकास आघाडीची ही संथपणाची आणि आम्हाला टाळण्याची भूमिका असली तरीही महाविकास आघाडीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. 2018 मध्ये झालेल्या पक्ष स्थापनेपासून, वंचित बहुजन आघाडीचा पाया दलित, आदिवासी, बहुजन, भटके विमुक्त, गरीब मराठा आणि मुस्लीम समूहांमध्ये वेगाने विस्तारत असतांना महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला केवळ 2 जागा देऊ केल्या आहेत”, असं वंचितने पत्रात म्हटलं आहे.

‘जाणीवपूर्वक ‘हरणाऱ्या’ जागा वंचितला द्यायच्या आणि…’

“हे मतदारसंघ ज्या जिल्ह्यातील आहेत तेथील आमच्या जिल्हा कार्यकारिणी बरोबर चर्चा केली असता असे जाणवले की, ह्या मतदारसंघात आमचे काम असले तरी महाविकास आघाडीचे अस्तित्व कमी आहे आणि त्यांना ह्या मतदार संघात जनाधार कमी आहे आणि त्यामुळे बंचित बहुजन आघाडीसाठी ही बाब अडचणीची आणि त्रासदायक आहे. तसेच हे अधोरेखित केले पाहीजे की मागील 2-3 निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी कोणीही ह्या जागा जिंकलेल्या नाहीत. जाणीवपूर्वक ‘हरणाऱ्या’ जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या आणि उर्वरित मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या लक्षणीय मतदारांचा पाठींबा मिळवायचा हा हेतू महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा आहे, असे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचं मत झालं आहे. ‘आपली लक्षणीय मते हवीत पण जिंकू शकणाऱ्या जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या नाहीत’ हेच मविआचे धोरण आहे हा ग्रह कार्यकर्त्यांचा होत आहे”, असं वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पत्रात म्हटलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.