AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्लॅटफॉर्मवर ‘वंदे भारत’ ट्रेन उभी असते, आणि बाहेर प्रवाशांची लूट

का सांभाळून बसले आहात साहेब तुम्ही ही पदं, एक भारतीय म्हणून ही लूट थांबवा, तेव्हा आपण आणखी स्वाभिमाने म्हणू, वंदे भारत.

प्लॅटफॉर्मवर 'वंदे भारत' ट्रेन उभी असते, आणि बाहेर प्रवाशांची लूट
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 07, 2023 | 9:51 PM
Share

मुंबई : वंदे भारत, ही वेगाने जाणारी ट्रेन, देशातील लहान, थोर यांना मनापासून अशा सुधारणा आवडतात, असे उपक्रम प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी देशप्रेम आणि स्वाभिमान वाढवणारे ठरतात. कुठे इंग्रजांच्या काळात कोळशांवर रेल्वे गाड्या चालत होत्या, भकाभका काळं धूर आकाशात सोडायच्या, आता मात्र वीजेवर धावतायत, काही दिवसांनी सोलवरवर धावतील.आपला देश किती बदलला. देशाने निश्चितच प्रगती केली. मुंबई सेन्ट्रल स्टेशनवर आज पहाटे वंदे भारत ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागली होती, काही प्रवाशी या चकाचक गाडीत आत आपआपल्या सीटवर जावून बसले होते. काही तरुण वंदे भारत ट्रेनच्या इंजीनजवळ, जे खूप आकर्षक आणि बुलेट ट्रेनसारखं वाटतं, त्यासोबत सेल्फी काढत होते.

बाहेर प्रवाशांची लूट सुरुच असते आपण किती वेगाने बदलतोय. सरकारनेच नाही तर आपणही स्वत:ला किती बदलून घेतलंय, अशा ट्रेनमध्ये तर स्वच्छतेचे नियम मोडण्याची कुणाची हिंमत होणार नाही. सरकार कोणतंही असो आपल्या अपेक्षा किती वाढल्या आहेत, आणि भारतीय म्हणून आपली जबाबदारीही.

खूप छान वाटलं, जेव्हा वंदे भारत या ट्रेनला पाहून तरुण सेल्फी काढत होते, आत बसलेले ज्येष्ठ नागरीक कुतूहलाने गाडीकडे पाहत होते, जणू या जन्मात हा प्रवास शक्य झाला, प्रवासाला सुरुवात होईल तेव्हा आणखी किती मजा येईल, असं सर्व त्यांचा चेहरा बोलत होता. आपला देश काही कमी नाही कुणासमोर, आपल्याला आपल्या देशाबद्दल, वेग आणि वेगाने प्रगती पाहिल्यावर मन आकाशात हेलकावे घेतं, स्वाभिमानाने छाती फुगून येते.

पहाटेच्या लुटीचा वेग वाढतोय

पण हे सर्व पाहून जेव्हा तुम्ही फक्त २५ ते ३० मीटर अंतर पार करुन स्टेशनच्या बाहेर याल, तेव्हा तुमची लूट सुरु होते, तुम्हाला मुंबई सेन्ट्रल स्टेशनवरुन घरी जायचं असतं, बाहेर रांगेने टॅक्सी उभ्या असतात, कुठे जायचंय, कुठे जायचंय, असं करत ७ ते ८ टॅक्सी ड्रायव्हर तुमचा रस्ता अडवतात. रस्ता अडवण्यात काही वाटत नाही, अखेर एक रोजगार आहे. अपेक्षा सर्वांनाच असतात.

पण तुम्हाला मुंबई- सेन्ट्रल ते लालबाग या अंतराचे ३०० रुपये सांगितले जातात, आपण त्यांना सांगतो मीटरने तर फक्त ६० रुपये होतात. मग ३०० रुपये का? तेव्हा ते म्हणतात, इधर मीटर नही चलता है, इधर सिर्फ प्री बुकिंग चलता है. जाना चाहते हो तो बोलो.

स्टेशन परिसरात चालते ही लूट

टॅक्सीवाले मीटरवर जायला, तयार नसताना आणखी जरा पुढे गेल्यावर एक टॅक्सीवाला मीटरवर जायला तयार झाला, तेव्हा तो म्हणाला की मुंबईत मोठ्या स्टेशनच्या मध्ये येताना पार्किंगच्या नावावर आमच्याकडून पैसे घेतले जातात, तुमच्या गाडीला नियम तोडण्याचा आतापर्यंत किती दंड आहे, ऑनलाईन तो देखील दाखवला जातो, अनेक वेळा, तो दंड आताच भरा अशी देखील जबरदस्ती असते, पण गाडीचा मालक वेगळा असेल, तर ते पैसे आम्ही कसे भरणार, तेव्हा थोडेफार हातात पैसे टेकवावे लागतात.

ग्राहकांना पडतोय मार, सुधारणार का आरटीओ

हा सर्व मार हा ग्राहकांवर पडतो. पहाटे मुंबई सेन्ट्रल टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस येथे हीच स्थिती आहे. आपण वेगवान वंदे भारत आणली, पण आपण देशाचे नागरीक, संबंधित परिवहन अधिकारी, पोलीस अधिकारी आणि सरकार म्हणून ही लूट तेवढ्या वेगाने थांबवू शकलो नाही, उलट या लुटीचा पहाटे आणि रात्री स्पीड वाढतो, परिवहन अधिकारी यांना याविषयी काहीच वाटत नाही का, पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या वरिष्ठांना हे माहितच नाही का, का सांभाळून बसले आहात साहेब तुम्ही ही पदं, एक भारतीय म्हणून ही लूट थांबवा, तेव्हा आपण आणखी स्वाभिमाने म्हणू, वंदे भारत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.