…आणि मयुर शेळकेला अधिक चार सेकंद मिळाले, ‘दुर्लक्षित हिरो’ विनोद जांगिड यांचा महाराष्ट्र दिनी सन्मान

एक्स्प्रेसचे लोको पायलट विनोद जांगिड यांनी लावलेल्या इमर्जन्सी ब्रेकमुळे गाडीचा वेग ताशी 105 किमीवरुन ताशी 80 किमीपर्यंत खाली आला (Vangni Express Vinod Jangid )

...आणि मयुर शेळकेला अधिक चार सेकंद मिळाले, 'दुर्लक्षित हिरो' विनोद जांगिड यांचा महाराष्ट्र दिनी सन्मान
लोको पायलट विनोद जांगिड
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 10:46 AM

अंबरनाथ : भरधाव वेगात एक्स्प्रेस येत असताना रुळावर पडलेल्या चिमुरड्याला रेल्वे पॉईंट्समन मयुर शेळकेने (Mayur Shelke) वाचवल्याची घटना काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकावर घडली होती. या घटनेतील एक्स्प्रेसचे लोको पायलट विनोद जांगिड (Vinod Jangid) यांचे प्रसंगावधानही मयुर इतकेच मोलाचे आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जांगिड यांचा अंबरनाथमध्ये विशेष सन्मान करण्यात आला. (Vangni Express Incident Unsung Hero Vinod Jangid conferred on Maharashtra Day Mayur Shelke)

विनोद जांगिड हे 17 एप्रिल रोजी उद्यान एक्सप्रेस पुण्याहून मुंबईकडे घेऊन येत होते. यावेळी वांगणी रेल्वे स्थानकात येत असताना असताना रेल्वे रुळावर एक लहान मुलगा पडलेला दिसला. तसंच एक तरुण (रेल्वेचा पॉईंट्समन मयुर शेळके) लहान मुलाच्या दिशेने धावत येताना त्यांना दिसला. त्यामुळे त्यांनी इमर्जन्सी ब्रेक मारले.

इमर्जन्सी ब्रेकमुळे वेग घटला

या ब्रेकमुळे गाडीचा वेग ताशी 105 किमीवरुन ताशी 80 किमीपर्यंत खाली आला आणि मयुरला तीन ते चार सेकंदांचा जास्तीचा कालावधी मिळाला. काही सेकंदातच जांगिड यांनी गाडी पूर्णपणे थांबवली सुद्धा. या घटनेनंतर मयुरचं सर्वत्र कौतुक झालं, मात्र विनोद जांगिड यांच्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष झालं.

अंबरनाथमध्ये जांगिड यांचा सत्कार

अंबरनाथमधील सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत विनोद जांगिड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी आपण इमर्जन्सी ब्रेक मारले, हे जरी खरं असलं तरीही मयुरने दाखवलेलं धाडस हे आजच्या काळात केवळ अचाट करणारं आहे, असं म्हणत विनोद जांगिड यांनी मयुर शेळकेचं कौतुक केलं.

“शेवटी आम्हाला दुःख होतंच”

गाडी चालवत असताना रुळावर अनेकदा काही माणसं किंवा जनावरं अपघाताने येतात, तर कोणी आत्महत्येसाठी आलेलं असतं. मात्र प्रत्येक वेळी आम्ही समोरच्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो, असं विनोद जांगिड म्हणाले. तर एखाद्या वेळी एखादं जनावर जरी गाडीच्या धडकेत मेलं, तरीही शेवटी आम्हाला दुःख होतंच, असंही विनोद जांगिड म्हणाले. (Vangni Express Vinod Jangid )

नेमकं काय घडलं ?

रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची 17 एप्रिल 2021 रोजी घडली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Video : अंध आईच्या हातातला मुलगा चालता चालता रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली

एकही दिल है, कितनी बार जितोगे? मयुर शेळके 50 हजारांपैकी निम्मी रक्कम अंध महिलेला देणार

(Vangni Express Incident Unsung Hero Vinod Jangid conferred on Maharashtra Day Mayur Shelke)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.