अनिल परब यांना पदवीधर निवडणुकीत उमेदवारी दिल्याने वरुण सरदेसाई नाराज, पक्षातली आतली बातमी काय?

ठाकरे गटाच्या गोटातील एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई पदवीधर निवडणुकीत ऐनवेळी अनिल परब यांना उमेदवारी दिल्याने वरुण सरदेसाई नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता पक्षाकडून वरुण सरदेसाई यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

अनिल परब यांना पदवीधर निवडणुकीत उमेदवारी दिल्याने वरुण सरदेसाई नाराज, पक्षातली आतली बातमी काय?
अनिल परब आणि वरुण सरदेसाई
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 5:51 PM

शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीसाठी वरुण सरदेसाई इच्छुक होते. पण पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. याउलट ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वरुण सरदेसाई हे नाराज झाले. पण आता त्यांच्याचबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. वरुण सरदेसाई यांना विधानसभा निवडणुकीत मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. या संधीसाठी वरुण सरदेसाई यांनी तयारीदेखील सुरु केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण सरदेसाई वांद्रे पूर्वे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी या मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापल्या संभाव्य उमेदवारांना हिरवा कंदील दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार संभाव्य उमेदवार हे कामाला लागले आहेत. ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रमांना सुरुवात केली आहे. वरुण सरदेसाई हे पदवीधर निवडणूक लढवण्यासाठी इ्च्छुक होते. पण ऐनवेळी अनिल परब यांना उमेदवारी दिल्याने वरुण सरदेसाई नाराज होते. यानंतर आता वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाईन निवडणूक लढण्याची शक्यता आहे. वरुण सरदेसाई या मतदारसंघातून निवडणूक लढले तर त्यांची लढत ही आमदार झिशान सिद्दीकी यांच्या विरोधात होऊ शकते.

वरुण सरदेसाई यांच्याकडून वांद्रे पूर्वमध्ये छत्रीवाटप

शिवसेना ठाकरे गटात कोणते विधानसभा मतदारसंघ घ्यायचे आणि का घ्यायचे? यासाठी व्ह्यूरचना आखण्यास सुरुवात झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे इच्छुक आहेत. त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. वरुण सरदेसाई यांनी पक्षाच्या शाखांना भेटी देणं, सामाजिक उपक्रम राबवणं सुरु केलेलं आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर या सामाजिक उपक्रमांचे आणि छत्रीवाटपाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जातोय की, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई हे विधानसभा निवडणूक लढवू शकतात. पक्षाकडून सध्या तशी चाचपणी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

याआधी मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वरुण सरदेसाई हे इच्छुक होते. त्यांनी मतदार नोंदणीसाठी प्रयत्न केले होते. पण पक्षाने ऐनवेळी अनिल परब यांना उमेदवारी घोषित केली होती. अनिल परब यांना उमेदवारी दिल्यामुळे वरुण सरदेसाई यांचा काहीसा हिरमोड झाला होता. पण त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. तुम्हाला विधानसभेसाठी तयारी करायची आहे, असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार वरुण सरदेसाई यांनी तयारी सुरु केलेली आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे.

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.