वसई-सातीवली रस्त्यावर दोघा भावांना ट्रकने चिरडले; भरधाव ट्रकची टेम्पोलाही धडक; वाहतूक विस्कळीत

अपघातात दोघांचा चिरडून मृत्यू झाला आहे. ते दोघे सखे भाऊ असल्याचे सांगितले जाते आहे. दोघां भावांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वसई-सातीवली रस्त्यावर दोघा भावांना ट्रकने चिरडले; भरधाव ट्रकची टेम्पोलाही धडक; वाहतूक विस्कळीत
वसई-सीतावली रस्त्यावर अपघात, दोघा सख्य़ा भावांचा मृत्यूImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 11:03 PM

वसईः वसईतील सातीवलीमध्ये ट्रकचा ब्रेक (Truck Break Fail) निकामी झाल्याने टेम्पो आणि दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोघा सख्या भावांचा मृत्यू (Two Brother Death) झाल्याची घटना आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वसई-सातीवली रस्त्यावर (Vasai-Sativali road) खळबळ उडाली असून भरधाव ट्रकच्या धडकेमुळे वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.  या अपघातामुळे या परिसरातली वाहतून काही काळ ठप्प झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच वसईमध्ये अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा तात्काळ दाखल झाल्यानंतर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ट्रकने टेम्पो-दुचाकीला उडवले

या भरधाव ट्रकने टेम्पो आणि मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकमधून दुचाकीअडकून काही अंतर फरपटत गेली होती. ट्रकच्या जोरदार बसलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील दोघांचा चिरडून मृत्यू झाला आहे.

दोघा सख्या भावांचा मृत्यू

अपघातात दोघांचा चिरडून मृत्यू झाला आहे. ते दोघे सखे भाऊ असल्याचे सांगितले जाते आहे. दोघां भावांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघां भावांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघात प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 निष्पाप लोकांचा जीव जातो

वसई-सातीवली रस्त्यावर आज पावणे सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या मार्गावर काही प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. मालवाहतूक करणारे ट्र्क या मार्गावरून प्रचंड वेगाने वाहने चालवत असतात. याआधीही या मार्गावर काही अपघात झाले आहे. मालवाहतूक वाहनांमुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळीच याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

घटनास्थळी रक्ताचा सडा

अपघातानंतर वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल, वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, क्रेनच्या साहाय्याने ट्रकला बाजूला काढले आहे. या अपघातात दोघा भावांचा चिरडून मृत्यू झाल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा सांडला होता.

वसई ते वसई रस्त्यावर वाहतूक कोंडी

सायंकाळच्या वेळीच आणि कार्यालय सुटण्याच्या वेळेतच हा अपघात झाल्याने वसई ते वसई फाटा जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघातप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.