आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात मोठी घसरण, फ्लॉवर 40 वरुन थेट 10 रुपयांवर
मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.
नवी मुंबई : नवी मुंबई आणि मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे (Vegetable Prices Decline) (Mumbai APMC Market). गेल्या अनेक दिवसांपासून गगनाला भिडलेले भाज्यांचे दर अखेर आज घसरले आहेत. मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक झाल्याने भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे (Vegetable Prices Decline).
मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, आज भाजीपाला मार्केटमध्ये एकूण 625 गाड्यांची आवक झाल्याने भाज्यांच्या दरात घसरण झाली. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमती वाढल्या होत्या. मात्र आता बाजारात भाज्यांचे दर कोसळले आहेत.
कालपर्यंत 40 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कोबी आणि फ्लॉवर आज 10 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. तसेच भेंडी 15 रुपये प्रतिकिलो, 30 रुपये जुडी विकला जाणाऱ्या कोथिंबीर 8 रुपये जुडी झाला आहे. मात्र, किरकोळ बाजारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने घाऊक बाजारात स्वस्त दरात मिळत असलेला भाजीपाला किरकोळ बाजारात दुप्पट दराने विकला जात आहे.
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास 625 गाड्यांची आवक झाली असून भाजीपाल्याच्या दरात घसरण सुरुच आहे. तर सध्या बाजारात फ्लॉवर 8 ते 10 रुपये, कोबी 8 ते 12 रुपये, मिरची 20 ते 30 रुपये, काकडी 6 ते 10 रुपये किलो विकली जात असून, टोमॅटो 15 ते 20 रुपये, वांगी 20 ते 30 रुपये तर कोथिंबीर 8 ते 10 रुपये, मेथी 10 ते 15 रुपये, पालक 5 ते 10 रुपये दराने विकली जात आहे (Vegetable Prices Decline).
भाज्यांचे आजचे दर
- फरसबी 30 ते 40 रुपये प्रतिकिलो
- फ्लॉवर 8 ते 10 रुपये प्रतिकिलो
- गवार 30 ते 40 रुपये प्रतिकिलो
- गाजर 20 ते 30 रुपये प्रतिकिलो
- भेंडी 10 ते 15 रुपये प्रतिकिलो
- कोबी 8 ते 12 रुपये प्रतिकिलो
- मिरची 25 ते 35 रुपये प्रतिकिलो
- टोमॅटो 15 ते 20 रुपये प्रतिकिलो
- काकडी 6 ते 10 रुपये प्रतिकिलो
- वांगी 20 ते 30 रुपये प्रतिकिलो
- कोथिंबीर 8 ते 10 रुपये प्रतिकिलो
- वाटाणा 26 ते 40 रुपये किलो
पुण्यात किरकोळ भाज्यांचे दर गगनाला, कोरोना संकट काळात ग्राहकांच्या खिशाला कात्रीhttps://t.co/nbxXwzFALg #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 14, 2020
Vegetable Prices Decline
संबंधित बातम्या :
सर्वसामान्यांसाठी खुशखबर; मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे आवक वाढल्याने दरात स्थिरता