AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: त्या PPE किटमध्ये सचिन वाझे? NIA चा संपूर्ण तपास ह्या 49 सेकंदाच्या व्हिडीओभोवती फिरतोय, कसा लागणार छडा? वाचा सविस्तर

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पीपीई किट घालून चालताना दिसून येत आहे. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून सचिन वाझेच असल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ला आहे.

VIDEO: त्या PPE किटमध्ये सचिन वाझे? NIA चा संपूर्ण तपास ह्या 49 सेकंदाच्या व्हिडीओभोवती फिरतोय, कसा लागणार छडा? वाचा सविस्तर
| Updated on: Mar 16, 2021 | 3:43 PM
Share

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीबाबतचा तपास आता एका 49 सेकंदाच्या व्हिडीओभोवती सुरु आहे. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पीपीई किट घालून चालताना दिसून येत आहे. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून सचिन वाझेच असल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ला आहे. त्यामुळे या 49 सेकंदाच्या व्हिडीओद्वारे आता NIA विविध तज्ज्ञांची मदत घेत संपूर्ण प्रकरणाचा छडा लावणार असल्याचं कळतंय.(Forensic podiatry will be used to locate the person in the CCTV footage)

पीपीई किट घातलेला संशयित

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज तपासयंत्रणांच्या हाती लागले होते. त्यात 25 फेब्रुवारीच्या रात्री अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ एक स्कॉर्पिओ येऊन थांबल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या स्कॉर्पिओसोबत एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही दिसत होती. ही इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसून आली होती. एकदा या इनोव्हा कारमधील ड्रायव्हर बाहेर उतरला होता. त्यावेळी या ड्रायव्हरने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातल्याचे दिसून आले होते.

‘ती’ व्यक्ती सचिन वाझेच?

पीपीई किट घातलेली ती व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा एनआयएला दाट संशय आहे. त्यामुळे आता एनआयएचे अधिकारी सचिन वाझे यांना पीपीई किट परिधान करुन चालायला लावणार आहेत. त्यांच्या हालचालीवरुन ती व्यक्ती सचिन वाझेच होती का, याचा शोध एनआयएचे अधिकारी घेतील. त्यामुळे आता या सगळ्यातून काय निष्कर्ष पुढे येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

चालण्यावरुन आरोपी कसा ओळखणार?

‘फॉरेन्सिक पोडियाट्री’चा वापर करुन अशा प्रकारच्या गुन्ह्याचा तपास केला जातो. यामध्ये एखाद्या व्यक्तीचे पाय, पायाचे ठसे, चालण्याची पद्धत याचं निरीक्षण केलं जातं. इतकच नाही तर पायाचं मोजमाप, रचना यावरुन आरोपीची ओळख पटवली जाऊ शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. समजा एखाद्या संशयिताने आपलं पूर्ण शरीर झाकलेलं असेल तरीही फॉरेन्सिक पोडियाट्रीचा वापर करुन आरोपी ओळखला जाऊ शकतो. फॉरेन्सिक पोडियाट्रीचा वापर जास्त करुन पाश्चिमात्य देशांमध्या व्यापक स्वरुपात केला जात असल्याचीही माहितीही तज्ज्ञांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

अंबानींच्या घराबाहेर कार सोडताना ओळख लपवण्यासाठी ‘त्या’ ड्रायव्हरकडून पीपीई किटचा वापर

सचिन वाझे यांचा पाठलाग होत असल्याचा दावा, वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं ‘त्या’ गाडीविषयी संभ्रम वाढला?

Forensic podiatry will be used to locate the person in the CCTV footage

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.