Vidhan Parishad Election : ‘अप्पा, मला कळलं तुम्ही शिव्या दिल्या म्हणून..’, ‘…तू काय मोठा झालास का?’ प्रवीण दरेकर-हितेंद्र ठाकुरांचा प्रेमळ संवाद कॅमेरात
ही मतं विधान परिषदेत आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजप अटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र दरेकर आणि हिंतेंद्र ठाकूर यांच्या भेटीवेळचा एक व्हिडिओ आता चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यात हितेंद्र ठाकूर प्रेमाने दरेकरांना तू काय मोठा झालास का? असा सवाल करताना दिसून येत आहेत.
विरार : आधी राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election) आणि आता विधान परिषद निवडणूक(Vidhan Parishad Election), बड्या पक्षांच्या नेत्यांकडून छोट्या पक्षांच्या नेत्यांचे उंबरे झिझवण सुरूच आहे. त्याला कारण ठरलंय विधान परिषदेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ, भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणायचे असतील तर त्यांना अपक्षांच्या मतांची आणि छोट्या पक्षांच्या मतांची गरज आहे. तीच अवस्था महाविकास आघाडीचीही आहे. त्यामुळेच आज भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि गिरीश महाजन हे थेट विरार लोकल पकडून बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला पोहोचले. कारण हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत तीन आमदारांच्या मतांचं गणित आहे. ही मतं विधान परिषदेत आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजप अटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र दरेकर आणि हिंतेंद्र ठाकूर यांच्या भेटीवेळचा एक व्हिडिओ आता चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यात हितेंद्र ठाकूर प्रेमाने दरेकरांना तू काय मोठा झालास का? असा सवाल करताना दिसून येत आहेत.
भेटीचा व्हिडिओ चर्चेत
भेटीवेळी नेमकं काय घडलं?
हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला इकडून प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनी थेट लोकल पकडली. हे दोघेही विराला उतरायच्या आधीच विरार रेल्वे स्थानकाला पोलिसांच्या गाड्यांनी आणि कार्यकर्त्यांच्या गाड्यांनी गराडा घातला होता. काही वेळात दरेकर, महाजन हे विरारमध्ये उतरले. तिथून थेट गाडीत बसून हितेंद्र ठाकूर यांना भेटायला पोहचले. यावेळी गाडीतून उतरताच प्रवीण दरेकर म्हणाले. काय आप्पा, मला कळलं मला तुम्ही शिव्या घातल्या, म्हणून यावं लागलं. त्यावेळी हितेंद्र ठाकूर म्हणाले, प्रवीण काय लय मोठा झाला का? विरोधी पक्ष नेता झाला तर.. असे म्हणताच एकच हशा पिकल्या, पुढे हितेंद्र ठाकूर म्हणाले मी प्रसादलाही घातल्या…आणि असे म्हणतच बैठकीसाठी निघून गेले. मात्र यांच्यातली जुनी आपलकी आणि मैत्री या संवादतून दिसून आली. या व्हिडिओचीच सध्या जास्त चर्चा आहे.
हितेंद्र ठाकूर यांची मतं कुणाला?
राज्यसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचे पत्ते शेवटपर्यंत ओपन केले नव्हते. तीच भूमिका आता ते विधान परिषदेलाही घेताना दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनीही हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतलीय. आणि आज दरेकर आणि महाजन हितेंद्र ठाकूर यांची मनधरणी करण्यास पोहोचले आहेत. त्यामुळे ठाकूर यांची मतं कुणाला जाणार? हाही प्रश्न अजून अनुत्तरीतच आहे.