Vidhan Parishad Election : राम शिंदे आणि एकनाथ खडसेंची ट्रायडंट बाहेर भेट, राष्ट्रवादी-भाजपमध्ये काय चर्चा?

नेमकी याच दोन नेत्यांची आज हॉटेल ट्रायडंटच्या बाहेर भेट घडून आली आहे. निवडणुकीला अवघे काही तास उरले असताना या दोन्ही नेत्यांमध्ये काय बरं चर्चा झाली असेल? असा सवाल आता प्रत्येकाच्या मनात आहे.

Vidhan Parishad Election : राम शिंदे आणि एकनाथ खडसेंची ट्रायडंट बाहेर भेट, राष्ट्रवादी-भाजपमध्ये काय चर्चा?
राम शिंदे आणि एकनाथ खडसेंची ट्रायडंट बाहेर भेटImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 11:17 PM

मुंबई : मुंबईतली फाईव्ह स्टार हॉटेलं ही नेत्यांनी गजबजून गेली आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना अलिशान आसा हॉटेल्समध्ये ठेवलं आहे. दुसरीकडे काही अपक्ष आणि छोटे पक्ष यांच्या मागची धावपळ (Vidhan Parishad Election) सुरूच आहे. असाच धावपळीत आज हॉटेल ट्रायडंटच्या बाहेर दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी पक्षातील दोन उमेदवार ट्रायडंटच्या बाहेर भेटले. या भेटीची आणि या फोटोची सध्या खास चर्चा आहे. भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) हे विधान परिषदेसाठी उमेदवार आहेत. तर दुसरीकेड राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांना संधी देण्यात आलीय. नेमकी याच दोन नेत्यांची आज हॉटेल ट्रायडंटच्या बाहेर भेट घडून आली आहे. निवडणुकीला अवघे काही तास उरले असताना या दोन्ही नेत्यांमध्ये काय बरं चर्चा झाली असेल? असा सवाल आता प्रत्येकाच्या मनात आहे. या चर्चेतला मजूकर मात्र गुलदस्त्यातच आहे. पण फोटो लक्ष वेधून घेणार ठरलाय.

दोघांची भेट कशी झाली?

राष्ट्रवादीने आपले आमदार हे हॉटेल ट्रयडंटमध्ये ठेवले आहेत. तर भाजपने आपले आमदार हॉटेल ताजमध्ये ठेवले आहेत. मात्र खडसे राष्ट्रवादीची बैठक संपवून हॉटेलमधून बाहेर येत असतानाच राम शिंदे हॉटेलमध्ये येत होते. एकनाथ खडसे आणि राम शिंदे हे आधी दोघेही भाजपमध्येच होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच खडसेंनी भाजपची साथ सोडली आणि दोघं वेगवेगळ्या पक्षातून प्रतिस्पर्धी झाले. तरी यांच्यातला जिव्हाळा अजूनही तसाच आहे.

रविवारी महाविकास आघाडीची बैठक

दुसरीकडे आज सर्व राजकीय पक्षांच्या बैठका पार पडल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या महावकास आघाडीची बैठक होणार आहे. शरद पवार दिल्लीला जाणार असल्याने या बैठकीला गैरहजर राहणार आहेत. मात्र तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी दिली आहे.

उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन

उद्या शिवसेनाचा वर्धापन दिनही आहे. त्यामुळे उद्याचा दिवस हा राज्याच्या राजकारणातला महत्वाचा दिवस असणार आहे. आधी ऑनलाईन प्लॅन झालेला शिवसेनेचा वर्धापन दिन उद्या हॉटेल वेस्टीनमध्येच साजरा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेस्टीनमध्ये दाखल होत महाराष्ट्राला आणि आमदारांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर दुसरीकडे उद्याचा दिवसही महाविकास आघाडी आणि भाजपच्या मतांचा जुळवाजुळवीचा आणि बैठकांचा ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...