Mumbai Vidya Chavan : विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी, फौजिया खान यांनी केली घोषणा

अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन, असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर माध्यमाकडूनही सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.

Mumbai Vidya Chavan : विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी, फौजिया खान यांनी केली घोषणा
विद्या चव्हाण यांना नियुक्तीपत्र देताना फौजिया खानImage Credit source: NCP
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 2:03 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान (Fauzia Khan) यांनी पत्रकार परिषदेत विद्या चव्हाण यांचे नाव जाहीर केले. सध्या राज्यातील जिल्हा कमिट्या तशाच राहणार आहेत. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्षपद पहिल्यांदाच देण्याचा निर्णय झाल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. यावेळी फौजिया खान यांनी विद्या चव्हाण यांना नियुक्तीचे पत्रही दिले. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्य महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे मार्चपासून हे पद रिक्त होते. आता या पदावर विद्या चव्हाण यांची वर्णी लागली आहे. राज्यातले विविध प्रश्न यानिमित्ताने हाताळणार असल्याचे विद्या चव्हाण यांनी सांगितले.

विद्या चव्हाण म्हणाल्या…

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष या पदावरची ही नियुक्ती स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. महिला वर्ग त्रासला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन, असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर माध्यमाकडूनही सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली. दरम्यान, मार्चमध्ये रुपाली चाकणकर यांनी महिला अध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते.

विभागवार नियुक्तीपत्रे

नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.