अनेकांना करोडोंचा गंडा घालणारा मुंबईचा नटवरलाल अखेर शिवाजीपार्क पोलिसांच्या तावडीत

दादरमध्ये लोकांना करोडोंचा गंडा घालणारा विष्णू जाधव याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अनेकांना करोडोंचा गंडा घालणारा मुंबईचा नटवरलाल अखेर शिवाजीपार्क पोलिसांच्या तावडीत
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 3:00 PM

मुंबई : दादर परिसरात काही एजंटशी हातमिळवणी करुन गंडा घालणाऱ्या टोळीचा म्होरक्या विष्णु महिपत जाधवला अखेर शिवाजीपार्क पोलिसांनी अटक केलीये. शिवाजीपार्क पोलीस स्टेशन ( Shivaji Park Police Station ) समोर असलेल्या नवलकर इमारतीचा लॅन्डलॉर्ड विष्णु महिपत जाधव ( Vishnu Jadhav ) याने अनेक लोकांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. इमारतीचा लॅन्डलॉर्ड विष्णु महिपत जाधवने इमारतीच्या पुनर्विकासाचे स्वप्न दाखवून २०१८ साली १४ लोकांना २ कोटी ३४ लक्ष ६८ हजार रुपयांना गंडा घातला. त्या संदर्भात एफआयआर १५९/१८ कलम ४२० भादवी शिवाजीपार्क पोलिसात नोंद देखील आहे.

जामीनावर बाहेर येताच विष्णु जाधवने लोकांना गंडा घालण्याचा धंदा पुन्हा वेगाने सुरु केला. माहिम पोलीस स्टेशन परिसरात सुद्धा चेक बाऊन्स प्रकरणी विष्णु जाधव विरुद्ध कलम १३८ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. बरेच दिवस पोलिसांच्या हातवर तुरी देऊन फरार असलेला विष्णु जाधव मोठ्या शिताफीने शिवाजीपार्क पोलिसांनी पकडून आणला.

दादर परिसरातील महिलेला ३७ लाखांना फसवल्याप्रकरणी ९ जुन २०२३ रोजी विष्णु जाधव विरोधात ४२०,४०६,४०९ कलमाखाली गुन्हा दाखल आहे. दादर परिसरात अनेकांची या प्रकरणी फसवणुक झाली असुन अनेक जण पोलिसात धाव घेत आहेत. तरी विष्णु जाधव आणि भुरट्या एजंटपासुन सावध राहण्यासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.