नवी मुंबईत 24 तारखेला पाणी पुरवठा बंद; मान्सुनपूर्व देखभाल व दुरूस्तीचे कामांमुळे पाणी नाही
या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहणार आहे.
मुंबई: मोरबे धरण (Morabe Dam) ते दिघा मुख्य जलवाहिनी (Digha main aqueduct) व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील मान्सुनपूर्व देखभाल व दुरूस्तीचे कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार (ता. 24 ) भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) क्षेत्रातील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात मंगळवार दि. 24 रोजी पाणी पुरवठा संध्याकाळी होणार नाही. यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना पाण्याची समस्या जाणवणार आहे. त्याबरोबरच बुधवारीही कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहणार आहे. तसेच बुधवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पावसाआधी कामं पार होणार?
पावसाळा सुरु झाल्यानंतर जलवाहिनींच्या कामं करत असताना अनेक अडथळे येत असतात त्यामुळे महानगरपालिकेकडून उन्हाळ्यातच पाणी पुरवठा संदर्भातील कामं केली जातात. आताही जूनमधील पावसाआधीच महानगरपालिकेकडून पाण्याची कामं केली जात असल्याने पाणी पुरवठा करताना अडथळा जाणवत आहे.
भोकरपाडा जलशुध्दीकरण बंद
भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या भागांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्याबाबतीच काही कामं राहून गेली असल्याने ती काम आता पावसाळ्यापूर्वी करण्यात येत आहेत.
युद्ध पातळीवर ही कामं सुरु
पावसाळ्यात पाणी पुरवठ्याबाबतची कामं करताना अनेक काम पालिकेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जलवाहिनी फुटणे, पाण्यात अडथळा निर्माण होणे, जोडणीची कामं ही पावसळ्यापूर्वीच करणे गरजेचे असल्याने महानगरपालिकेकडून युद्ध पातळीवर ही कामं सुरु आहेत.