Jijamata Udyan : आम्ही राणीबागेत हाय आत्ता, काय झाडी, काय गर्दी, काय प्राणी ओक्केमध्ये हाय!
मुंबई महापालिका याच वाक्याला धरून जाहिरात तयार केली. तुम्ही कुठं आहात, तर आम्ही राणीबागेत हाय आत्ता, काय झाडी, काय गर्दी, काय प्राणी ओक्केमध्ये हाय एकदम, अशी ही जाहिरात आहे.
मुंबई : शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांचं वाक्य प्रसिद्ध झालं. आता या त्यांच्या वाक्यावरून मुंबई महापालिकेच्या राणी बागेलाही भुरळ पडली. त्यांनीही अशा प्रकारची जाहिरात काढली. या जाहिरातीला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहावं लागेल. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई महापालिकेच्या (Municipal Corporation) प्रसिद्ध वीर जीजामाता उद्यान-राणीबागेची जाहिरात शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगवरून प्रेरित होऊन तयार केलीय. आम्ही राणीबागेत हाय आत्ता- काय झाडी, काय गर्दी, काय प्राणी ओक्केमध्ये हाय एकदम, अशी ती जाहिरात आहे. वीर जीजामाता उद्यानच्या (Udyan) सोशल मीडियावरून ही जाहिरात प्रसारित करण्यात आलीय. या जाहिरातीलाही चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.
काय म्हणाले होते शहाजीबापू पाटील
शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाक्याची भूरळ साऱ्या महाराष्ट्राला पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनाही या वाक्याची भुरळ पडली. सर्व आमदार लॉबीमध्ये आले असताना त्यांनी शहाजीबापू पाटील यांचं कौतुक केलं. त्यांचं सुपरहीट असलेलं वाक्य पुन्हा म्हणून दाखविण्याची विनंती केली. काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल… एकदम ओके. कार्यकर्त्यांशी बोलताना ते असं म्हणाले. हे वाक्य अख्या राज्यात प्रसिद्ध झाले.
जाहिरात नेमकी काय
शहाजीबापू पाटील हे ग्रामीण भागातले आमदार. एका कार्यकर्त्यानं शहाजीबापू पाटील यांना फोन केला. तेव्हा ते गुवाहाटीत होते. तेव्हा झालेल्या संवादाची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हे वाक्य धरून नेटकऱ्यांनी मिम्स तयार केले. आता तर मुंबई महापालिका याच वाक्याला धरून जाहिरात तयार केली. तुम्ही कुठं आहात, तर आम्ही राणीबागेत हाय आत्ता, काय झाडी, काय गर्दी, काय प्राणी ओक्केमध्ये हाय एकदम, अशी ही जाहिरात आहे.
शहराच्या मध्यभागी असलेलं उद्यान
वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान असं याचं नाव. मुंबई शहराच्या मधोमध 50 एकर जागेत पसरलाय. मुंबईतील हा सर्वात जुना मोठा उद्यान आहे. शिवाजी महाराजांची आई जीताबाई यांच्या नावानं याचं नामकरण झालं. आता सोशल मीडियासाठी याची जाहिरात करण्यात आली.