Manisha Kayande: एमआरआय कक्षात फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करणं चुकीचंच, लिलावतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करणार: मनिषा कायंदे

| Updated on: May 09, 2022 | 2:10 PM

Manisha Kayande: शिवसेना आमदार मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं.

Manisha Kayande: एमआरआय कक्षात फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करणं चुकीचंच, लिलावतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करणार: मनिषा कायंदे
लिलावतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करणार: मनिषा कायंदे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: लिलावती रुग्णालय (lilavati hospital) आम्हाला आमचं वाटतं. खासदार नवनीत राणा (navneet rana) इकडे उपचारासाठी आल्या होत्या. इथे आल्यावर एमआरआय करतानाचे त्यांचे व्हिडिओ, फोटो दिसले. त्यांचा आजार काय होता आणि काय नाही या गोष्टी न्याय प्रविष्ट आहे. त्यावर आम्ही बोलणार नाही. हे एक चांगलं हॉस्पिटल आहे. यात सामान्य नागरिक आणि व्हिआयपी येतात. नियम कडक असतात. विनाकारण फोटोग्राफी करण्यास कुणालाही परवानगी नाही. एमआरआयमध्ये तुम्हाला मेटल घेऊन जाता येत नाही. पेशंटच्या मुव्हमेंटची खबरदारी घेतली जाते. असं असताना एमआरआय कक्षात जाऊन व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी होणं चुकीचं आहे. त्याविरोधात आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहोत, अशी माहिती शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी दिली. मनिषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयात मीडियाशी संवाद साधला.

शिवसेना आमदार मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवास साधला. आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहोत. हॉस्पिटलची आम्हाला काळजी आहे. या रुग्णालयाचे नाव खराब होऊ नये. त्यांना सरकारने जागा दिलेली असते. हॉस्पिटलला कुणी दबाव आणला का हा प्रश्न आहे. एमआरआय सुरू असते तेव्हा स्टाफही दूर असतो. स्पीकरवर सूचना दिल्या जातात. असं असताना दरवाजा उघडा ठेवला. फोटो काढण्यास परवानगी दिली. हे सर्व गंभीर आहे, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

तळापर्यंत जाऊन पाठपुरावा करू

आम्ही कुणाला त्रास द्यायला आलो नाही, टार्गेट करायला आलो नाही. स्टाफच्या नोकऱ्या आहेत. पण त्यांच्यावर कुणी दबाव टाकला असेल तर आम्ही त्याच्या तळापर्यंत जाऊन पाठपुरावा करू. रुग्णालयात पेशंट गाईड आहे. उद्या कोणीही कोणतीही ट्रिटमेंट काढताना फोटो काढेल. ही ब्रीच ऑफ सिक्युरीटी आणि प्रायव्हसी आहे. या हॉस्पिटलमध्ये काहीही होतं असा त्याचा अर्थ आहे, असं त्या म्हणाल्या.

तीन दिवसात बऱ्या कशा झाल्या?

महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी याबाबतचा अहवाल मागवला आहे. रुग्णालयातील लोकांनी तो अहवाल द्यावा. काही आघात होण्यासाठी एक सेकंदही पुरेसा असतो. एमआरआय कक्षात तर अशा गोष्टी होऊ नये, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. हॉस्पिटल प्रशासनानेही फोटो काढणं चुकीचं असल्याचं मान्य केलं आहे, असंही त्या म्हणाल्या. नवनीत राणा यांचं खरंच एमआरआय झालं का? हा प्रश्न आहे. तसेच तीन दिवसांत त्या बऱ्या कशा झाल्या हाही सवाल आहे, असंही त्या म्हणाल्या.