Maharashtra Rain | पुढचे 3 ते 4 तास अतिमहत्त्वाचे, महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना अलर्ट, काळजी घ्या

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज धुवांधार पाऊस पडतोय. हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाकडून पुढच्या काही तासांसाठी अलर्टही जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain | पुढचे 3 ते 4 तास अतिमहत्त्वाचे, महाराष्ट्रातील 'या' सहा जिल्ह्यांना अलर्ट, काळजी घ्या
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 2:58 PM

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात हवा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले होते. याशिवाय धरणांमधील पणासाठा देखील संपत आल्याने प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली होती. पाऊस पडला नाही तर भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटाला सामोरं जावं लागेल, अशी भीती वर्तवली जात होती. त्यामुळे सर्वजण पाण्याची चातकासारखी वाट पाहत होती. अखेर सर्वांची हाक पावसाने ऐकली आणि गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावासाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगलाच मुसळधार कोसळतोय. पण त्याचं हे कोसळणं जरुरुीचं आहे. कारण अजूनही हवा तितक्या स्वरुपात पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुरेशा पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांच्या नागरिकांना पुढच्या तीन ते चार तासांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचं पुनरागमन झालंय. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पोहोचला नसला तरी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पुणे या सहा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या सहा जिल्ह्यांसाठी पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे आहेत.

हवामान विभागाचा नेमका अलर्ट काय?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे या सहा जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये पुढच्या तीन ते चार तासांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरुपांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाऊस हवा तसा पोहोचू शकलेला नाही. अनेक ठिकाणी पाऊस हा रिमझिम पडताना दिसतोय. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. पुरेसा पाऊस नसल्यामुळे पिकं पूर्णपणे करपली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला सरकारकडे आशा आहे. सरकार दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा देईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.