वेब सीरिजने भारतीय संस्कृती बिघडवली, कठोर कायदा करा; धर्मगुरु देवकीनंदन ठाकूर यांची मागणी
वेब सिरीजमुळे भारतीय संस्कृती खराब होत आहे. पवित्र नात्याचा अनादर होत आहे असा घणाघात देवकीनंदन ठाकूर यांनी केला आहे. हे थांबवण्यासाठी भारत सरकारला कठोर कायदा करण्याची विनंती आहे असेही ते म्हणाले. याशिवाय सनातन धर्माबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना देवकीनंदन ठाकूर यांनी खडेबोल सुनावले आहे.
मुंबई : मुंबईतील बोरिवली येथे धर्मगुरु देवकीनंदन ठाकूर (Devkinandan Thakur) यांनी पत्रकार परिषद घेतली. देवकीनंदन ठाकूर म्हणाले. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे प्रभू श्रीरामांना इतके दिवस दूर राहावे लागले. मात्र 22 जानेवारीला अखेर राम मंदिरातचे स्वप्न साकार होणार आहे. या निमित्ताने प्रत्येक घरात रामायण वाचले पाहिजे. तसेच दिवे लावले पाहिजे असं देवकीनंदन ठाकूर म्हणाले. ज्या पद्धतीने आज आपण जानेवारीत राममंदिराची तयारी करत आहोत. तशीच येत्या जानेवारीत श्रीकृष्ण मंदिराची तयारी करा असे आवाहनही त्यांनी केले.
वेब सिरीजमुळे भारतीय संस्कृती खराब होत आहे
वेब सिरीजमुळे भारतीय संस्कृती खराब होत आहे. पवित्र नात्याचा अनादर होत आहे असा घणाघात देवकीनंदन ठाकूर यांनी केला आहे. हे थांबवण्यासाठी भारत सरकारला कठोर कायदा करण्याची विनंती आहे असेही ते म्हणाले. याशिवाय सनातन धर्माबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले आहे. सनातनला कोरोना, एचआयव्ही झाला असं म्हणणाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरले. आम्ही इतर कोणत्याही धर्माबद्दल बोलत नसताना तुम्ही आमच्या धर्माबद्दल असे अपशब्द कसे बोलू शकता? संवैधानिक पदावर बसलेले लोकं सनातन संकृतीचा असा अपमान करत असतील तर त्यांना निवडणूक लढवण्यासाठी आजीवन बंदी घालावी अशी प्रतिक्रीया देवकीनंदन ठाकूर यांनी दिली.
वक्फ बोर्डावर साधला निशाना
देशात समांतर सरकार चालणार नाही. एक देश एका कायद्याने चालेल असं म्हणत त्यांनी वक्फ बोर्डावर निशाना साधला. पैशाच्या बाबतीत वक्फ बोर्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्व सरकारी मालमत्ता वक्फ बोर्डाकडून परत घेण्यात याव्यात असे आवाहन देवकीनंदन ठाकूर यांनी केले आहे. अन्यथा आम्हालाही तेवढ्याच जागेची गरज आहे जेणेकरून आम्ही सनातन मंडळही बनवू शकू असे ठाकूर म्हणाले.