मुलाकडून लग्नाच्या बायोडेटात विचित्र अपेक्षा, अपेक्षा काय तर ‘मला मुलीच्या गालावर ..’

डोळ्यात हसून हसून पाणी आणेल, आणि तुम्हाला राग देखील येईल की ही काय अपेक्षा असू शकते. मुलगी गोरी असावी ही एक अपेक्षा आपण ऐकून आहोत. पण यापेक्षा आणखी विचित्र अपेक्षा आहेत.

मुलाकडून लग्नाच्या बायोडेटात विचित्र अपेक्षा, अपेक्षा काय तर 'मला मुलीच्या गालावर ..'
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 5:23 PM

मुंबई : मुलाकडून लग्नाच्या बायोडेटात सर्वात विचित्र अपेक्षा, मला मुलीच्या गालावर … ही बातमीची हेडलाईन वाचून तुम्हाला नक्कीच वाटलं असेल, की मुलाला मुलीच्या गालावर ‘किस’ हवा असेल. पण या मुलाने किस मागितलेला नाही, यापेक्षा विचित्र मागणी आहे.  तर या प्रकरणाचा मात्र किस काढलाच पाहिजे, असं हे प्रकरण आहे. आमच्याकडे जो बायोडेटा ऐकीव स्वरुपात आला आहे, तर या बायोडेटात यापेक्षाही विचित्र अपेक्षा आहे. सर्वच मुलामुलींचे आईवडील आजकाल लग्न जमत नाही, म्हणून चिंतेत असतात. आपल्या मुलीं नकळत दबाव आणत असतात, थोडं तरी एडजेस्ट कर, कसा मुलगा असावा तुला, तुला काय आता राजकुमार आणणार, वय वाढत चाललंय तुझं, ‘लोकं काय’ म्हणतील. ‘लोकं काय’ म्हणतील, ही सर्वात मोठी आणि विनाकारण भीती सर्व पालक घेऊन बसतात.

कारण संसार मुला-मुलींना करायचा असतो, ते ‘लोकं काय’ म्हणतील, ‘ ते लोकं’ कधी तरी चांगलं म्हणतील एवढीही अपेक्षा न ठेवलेली बरी.कारण आता लग्नाचा ट्रेन्ड बदलला आहे, लग्न आता नातेवाईक कमी आणि ज्यांना लग्न करायचं आहे तेच ठरवतात,अर्थातच तेच त्यांचे जीवनसाथी निवडतात, यात पुढची जी काही जबाबदारी असेल ते दोन्ही घेतात.

मुलींनी आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं, म्हणजेच नोकरी मिळवली तर त्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतात. तरी देखील काही मुलांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या आजही आहेतच, अपेक्षा असाव्यात पण त्या विचित्र नसाव्यात आजही अनेक जणं एक वेगळ्या जगात आहेत. पण या मुलींच्या पगारावर संसाराची आणि आपल्या आयुष्याची आयतखाऊ सुरक्षा शोधणारे देखील आहेत, हे देखील विसरुन चालणार नाही.

एका मुलीला जो बायोडेटा आला आहे, आणि त्यात ज्या २ अपेक्षा आहेत, त्या अतिशय विचित्र आहेत, यावरुन लक्षात येतं त्या मुलाच्या मनात काय चाललं आहे. अपेक्षा करा, पण अशा अपेक्षा करणे निश्चित चुकीची बाब आहे. बायोडेटामध्ये मुलांकडून अपेक्षा केल्या जातात, सरकारी नोकरी असावी, पण आता मुलांनीही यापेक्षा मोठी अपेक्षा केली आहे. ती म्हणजे मुलगी नोकरीवाली असावी, आणि तिला जॉब सिक्युरिटी असावी, म्हणजे न जाणारा जॉब असावा.ही पहिली अपेक्षा आहे.

नंबर २ ची अपेक्षा ही सर्वात भयंकर आणि विचित्र आहे. मुलाने व्यक्त केलेली अपेक्षा तुमच्या डोळ्यात हसून हसून पाणी आणेल, आणि तुम्हाला राग देखील येईल की ही काय अपेक्षा असू शकते. मुलगी गोरी असावी ही एक अपेक्षा आपण ऐकून आहोत. पण यापेक्षा आणखी विचित्र अपेक्षा आहेत.

मुलगी उंच असावी, सळपातळ असावी अशा देखील अपेक्षा आहेत. पण या बायोडेटात जी विचित्र अपेक्षा ऐकण्यात आली ती आहे की, मुलीच्या गालावर ‘खळी’ पडावी, असावी. आधुनिक युगात लग्न जुळणे कठीण असताना, मुलीच्या गालावर खळी पडावी, मुलीच्या ओठावर तिळ असावी, अशा अपेक्षा या विचित्रच आहेत, कारण संसाराचे रंग या गोष्टीवर ठरत नाहीत, हे यांना कोण सांगणार. शेवटी एवढंच म्हणता येईल शुभमंगल सावधान.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.