‘भाजपची सत्ता असताना खडसेंकडे मंत्रिमंडळातील 10 खाती होती; ओबीसींचा यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो?’

Pravin Darekar | फडणवीस सरकार सत्तेत होतं तेव्हा एकनाथ खडसे यांच्याकडे महत्त्वाची दहा खाती देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांना महत्वाचं ग्रामविकासचं खातं दिलं गेलं.

'भाजपची सत्ता असताना खडसेंकडे मंत्रिमंडळातील 10 खाती होती; ओबीसींचा यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो?'
प्रविण दरेकर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 12:25 PM

मुंबई: महाराष्ट्रात भाजप सरकार होतं त्यावेळेस एकनाथ खडसे यांच्याकडे दहा खाती तर पंकजा मुंडे यांना महत्वाचं ग्राम विकास खातं दिलं होतं. आजही पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजप नेत्या म्हणून राज्यात उत्तम नेतृत्व करत आहेत. आज देशाचे पंतप्रधान ओबीसी (OBC) समाजाचे असून याहून ओबीसींचा मोठा सन्मान काय असेल, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला. (BJP leader Pravin Darekar hits back Shivsena accusations over OBC reservation)

ते सोमवारी मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांना डावलण्यात आल्याच्या शिवसेनेच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. फडणवीस सरकार सत्तेत होतं तेव्हा एकनाथ खडसे यांच्याकडे महत्त्वाची दहा खाती देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांना महत्वाचं ग्रामविकासचं खातं दिलं गेलं. आज ही त्या राष्ट्रीय स्तरावर भाजप नेत्या म्हणून ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आहेत, असेही प्रविण दरेकर यांनी सांगितले.

महाविकासआघाडीत अंतर्गत धुसफूस

प्रविण दरेकर यांनी ‘सामना’च्या अग्रलेखावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर टीका केली. वाघ कधी कुणाच्या इशाऱ्यावर चालत नाही तो फक्त सर्कसमध्येच चालतो. निधर्मवादीचे ढोल बडवणाऱ्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदार पणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. या सरकारने ओबीसी समाजाचा अवमान केला आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांची नाराजी समोर आली, असा टोला दरेकर यांनी यावेळी लगवला.

‘ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता…?’

रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला होता. त्यांनी ट्विट करत फडणवीसांना रोकडा सवाल केलाय. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता…? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असं त्यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राची जनताच आता देवेंद्र फडणवीसांना संन्यास देईल, नाना पटोलेंचा पलटवार

देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, त्यांचं भविष्य उज्ज्वल, मी स्वत: त्यांना भेटेन : संजय राऊत

काँग्रेसने सातत्याने ओबीसींवर अन्याय केला, म्हणून वडेट्टीवारांनी खदखद व्यक्त केली, प्रवीण दरेकरांचा टोला

(BJP leader Pravin Darekar hits back Shivsena accusations over OBC reservation)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.