काशिफ खानला ओळखत नाही, पार्टीचं निमंत्रण होतं, पण मी गेलो नाही; अस्लम शेख यांचा खुलासा

मी काशिफ खानला ओळखत नाही. त्याने मला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. पण मी पार्टीला गेलो नाही. क्रुझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. (who is kashif khan? i don't know, says aslam shaikh)

काशिफ खानला ओळखत नाही, पार्टीचं निमंत्रण होतं, पण मी गेलो नाही; अस्लम शेख यांचा खुलासा
गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मच्छीमाराच्या कुटुंबाला राज्यसरकार करणार 5 लाखांची मदत
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 12:38 PM

मुंबई: मी काशिफ खानला ओळखत नाही. त्याने मला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. पण मी पार्टीला गेलो नाही. क्रुझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही षडयंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे मला माहीत नाही. त्याचा तपास एजन्सीने करावं, असा खुलासा पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला.

पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काशिफ खानच्या आमंत्रणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. मी काशिफ खान नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. त्याला मी कधीच भेटलो नाही. त्याने मला पार्टीला बोलावलं होतं. मी पालकमंत्री आहे. त्यामुळे अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणे मला या पार्टीचंही आमंत्रण होतं. या प्रकरणात षडयंत्र होतं की नाही याचा एजन्सी तपास करत आहे, असं अस्लम शेख म्हणाले.

काशिफ खानशी फोनवर संभाषण झालं नाही

काशिफ खानकडे माझा नंबर आहे की नाही मला माहीत नाही. माझा मोबाईल पीएकडे असतो. तो एका ठिकाणी मला भेटला होता. तो तिथे कसा आला मला माहीत नाही. त्याने मला भेटून पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. आता त्या पार्टीत काय होणार होतं. मला माहीत नाही. हे तपास यंत्रणेने शोधावं. काशिफशी फोनवर संभाष झालं नाही. संभाषण झाल्याचं मला आठवत नाही. त्याने भेटून आमंत्रण दिलं होतं हे मात्र नक्की, असं त्यांनी सांगितलं.

ज्या कार्यक्रमाला जात नाही त्याची माहिती घेतच नाही

दिवसभरात मला 50 लोक मला आमंत्रित करतात. एखाद्या लग्नात गेलो तर लोकं वाढदिवसाचंही निमंत्रण देत असतात. मी ज्या कार्यक्रमात जातो. त्याची माहिती घेत असतो. जिथे जातच नाही, त्याची माहिती घेत नाही. मला वाटतं ज्या कार्यक्रमाला जायचं नाही त्याची माहिती घेणंही योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

गुजरातमध्ये 20 हजार कोटीचं ड्रग्ज पकडलं त्याची चर्चाच नाही

ही केस जशी चालली. सुरुवातीला हे ड्रग्ज प्रकरण वाटत होतं. शाहरुख खानच्या मुलाचं नाव आल्यानंतर मीडियाने त्याचं कव्हरेज सुरू केलं. त्याचवेळी गुजरातमध्ये 20 हजार कोटीचं ड्रग्ज पकडलं त्यावर चर्चा झाली नाही, याकडेही त्यांनी मीडियाचं लक्ष वेधलं. एका मुलाला नशामुक्ती केंद्रात पाठवायला हवं होतं की नाही हे तपासायला हवं होतं. मीडियानेही तपास करायला हवा होता, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

“हर्षदा रेडकरवर ड्रग्ज प्रकरणात केस झाली, तेव्हा मी आणि क्रांती…” मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण

LK Advani Birthday : ‘हॅप्पी बर्थडे अडवाणीजी’, मोदी, शहा, राजनाथ, जेपी नड्डांकडून शुभेच्छांचा वर्षाव

शाहरुखच्या लेकीची दिवाळी न्यूयॉर्कमध्येच! भाऊ आर्यनला भेटण्याऐवजी मैत्रिणींसोबत धमाल करतेय सुहाना खान

(who is kashif khan? i don’t know, says aslam shaikh)

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.