Sharjeel Usmani : हिंदू समाज सडका झालाय म्हणणारा शरजील उस्मानी कोण आहे?

Who is Sharjeel Usmani : शरजील उस्मानीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

Sharjeel Usmani : हिंदू समाज सडका झालाय म्हणणारा शरजील उस्मानी कोण आहे?
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 5:13 PM

मुंबई : ‘हिंदू समाज आहा पूर्णपणे सडला आहे’ असं वक्तव्य केल्यानंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी (Who is Sharjeel Usmani?) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजपनं त्याच्या विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शरजीलविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरजीलविरोधात कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी, असं आव्हानही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलं आहे. त्यामुळे हिंदू समाज सडला आहे, असं म्हणणारा शरजील उस्मानी कोण? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल.(Who is Sharjeel Usmani who made controversial statements about Hindu society?)

सीएए कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी

अलिगड मुस्लिम विद्यापीठात नागरिकत्व संशोधन कायदा अर्थात CAA आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी अर्थात NRC वरुन 15 डिसेंबर 2019 मध्ये मोठा राडा झाला होता. त्यात डीआयजी, एसपीसह अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. त्यावेळी प्राथमिक तपासात 7 जणांचं नाव समोर आलं होतं. त्यात शरजील उस्मानीचाही समावेश होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरजील उस्मानीचे वडील डॉ. तारिक मोहम्मत उस्मानी हे AMU मध्ये M.Sc विभागात असोसिएच प्रोफेसर आहेत.

‘बाबरी मस्जित पुन्हा उभारु’

अलीगड मुस्लिम विद्यापीठातील राड्यानंतर शरजील एक महिन्यासाठी जामिनावर सुटला होता. त्यावेळीही शरजीलने प्रक्षोभक भाषण केलं होतं. शरजील उस्मानी याने अयोध्या निकालानंतर बाबरी मस्जित पुन्हा उभारु असं ट्वीट केलं होतं. त्याचबरोबर ‘आज से पचास साल बाद अगर हमारी तारीख को सही ढंग से लिखा जाए तो हम अपने तबकों के दो लोगों को पाएंगे. बुरे लोग और अच्छे लोग. बुरे लोग वे होंगे जो हमारे इस्तेहसाल (उत्पीड़न) के दौरान चुप रहे. अच्छे लोग वे होंगे जो उत्पीड़न के लिए इंतजार करते थे, केवल खाली नारे, रंगीन पोस्टर और मुस्तकिल तौर पर उबाऊ हैशटैग के साथ इसकी मज़म्मत करते थे. अब से पचास साल बाद, लोग मेरे जैसे अच्छे लोगों से भी बहुत खुश नहीं होंगे’, असं ट्वीटही त्याने केलं होतं.

एल्गार परिषदेत शरजील उस्मानी काय म्हणाला?

‘भारतात स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घ्यायचं असेल तर दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे तुम्हाला म्हणावं लागेल की काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे आणि दुसरं म्हणजे पाकिस्तान मुर्दाबाद. तर तुम्ही राष्ट्रवादी आहात. तुम्ही त्या व्याख्येत बसता. पाकिस्तानातही अशीच एखादी व्याख्या असेल. साऊथ आफ्रिकेतही असेल. मी राष्ट्रवादाला मानत नाही. आजचा हिंदू समाज, हिंदुस्तानात हिंदू समाज वाईटरित्या सडला आहे. जुनैदला चालत्या रेल्वेमध्ये एक गर्दी 31 वेळा चाकू मारुन त्याची हत्या करते. तेव्हा कुणी अडवायला येत नाही. ते लोक तुमच्या आणि आमच्यातून येतात. हे लोक जे मॉब लिंचिंग करतात ते हत्या करण्याव्यतीरिक्त आपल्या घरी जाऊन काय करत असतील? हे लोक असं काय करतात की हत्या करुन आल्यानंतर ते आपल्यासोबत बसतात, उठतात, जेवण करतात, सिनेमा पाहायलाही जातात. पुन्हा दुसऱ्या दिवशी कुणाला तरी पकडतात, पुन्हा हत्या करतात आणि पुन्हा नॉर्मल लाईफ जगतात. ते प्रेम करतात, वडिलांचे आशीर्वाद घेतात. मंदिरात पूजाही करतात. पण पुन्हा बाहेर येऊन तेच करतात. हे सर्व इतक्या सहतेनं सुरु आहे की, लिंचिंग होतेय काही हरकत नाही. यापूर्वी मुस्लिम व्यक्तीची हत्या करण्यासाठी एखादं कारण दिलं जात होतं. तो एखाद्या दहशतवादी संघटनेशी जोडलेला आहे. तो सीमीचा सदस्य आहे. या बॉम्बस्फोटाशी त्याचा संबंध आहे. आता मात्र कुठल्याही कारणाची गरज नाही. मुस्लिम आहे मारुन टाकू’,  असं वक्तव्य शरजील याने एल्गार परिषदेत केलं आहे. आणि त्याच्या याच वक्तव्यावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार

सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली तरी एल्गार परिषद घेऊच; तुरुंग, मरणाला घाबरत नाही: कोळसे-पाटील

Who is Sharjeel Usmani who made controversial statements about Hindu society?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.