Yashwant Jadhav: कोण आहेत शिवसेनेचे यशवंत जाधव, जे आयटीच्या रडारवर आलेले आहेत?

शिवसेनेचे उपनेते आणि महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे आयटीच्या रडारवर आले आहेत. आधी नोटीस पाठवल्यानंतर आज आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी केली आहे.

Yashwant Jadhav: कोण आहेत शिवसेनेचे यशवंत जाधव, जे आयटीच्या रडारवर आलेले आहेत?
कोण आहेत शिवसेनेचे यशवंत जाधव?, जे आयटीच्या रडारवर आलेले आहेत
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 11:53 AM

मुंबई: शिवसेनेचे उपनेते आणि महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) हे आयटीच्या रडारवर (income tax raid ) आले आहेत. आधी नोटीस पाठवल्यानंतर आज आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी केली आहे. तसेच त्यांच्या एका सहकाऱ्याच्या घरावरही छापेमारली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या आरोपानंतर जाधव यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच ती रक्कम युएईला ठेवली असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ही धाड मारण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. तसेच आयकर विभागाच्या छापेमारीमुळे यशवंत जाधव अधिकच चर्चेत आले आहेत. शाखाप्रमुख ते स्थायी समिती अध्यक्ष असा जाधव यांचा प्रवास राहिला आहे. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या सुद्धा आमदार आहेत. त्याही नगरसेविका होत्या.

कोण आहेत यशवंत जाधव

यशवंत जाधव हे शिवसेनेचे उपनेते आहेत. शिवसैनिक म्हणून त्यांनी शिवसेनेत कामास सुरुवात केली. पुढे शाखाप्रमुख ते स्थायी समिती अध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. 1997मध्ये ते पहिल्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मधला काही काळ वगळता ते सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. जाधव यांनी महापालिकेत अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केलं आहे. त्यांची पत्नी यामिनी जाधवही नगरसेविका होत्या. सध्या त्या शिवसेनेच्या आमदार आहेत.

विधानसभेला फटका

यशवंत जाधव यांनी भायखळ्यातून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. पण त्यात त्यांना यश आलं नव्हतं. मात्र, त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या पहिल्याच प्रयत्नात विधानसभेवर निवडून आल्या आहेत. यामिनी जाधव यांनी महापालिकेच्या बाजार व उद्यान समिती, शिक्षण समिती आणि जिल्हा नियोजन समितीवर काम पाहिलं आहे.

यशवंत जाधवांचा अल्प परिचय

  1. नगरसेवक – 1997, 2017, 2007
  2. सभागृह नेता – 2017
  3. अध्यक्ष – स्थायी समिती 2018, 2019, 2020, 2021
  4. अध्यक्ष – स्थापत्य समिती (शहर) 2000 ते 2001
  5. अध्यक्ष – प्रभाग समिती ( A,B, & E Ward) 2001 ते 2002
  6. अध्यक्ष – बाजार व उद्यान समिती 2007 ते 2009
  7. सदस्य – स्थायी समिती 1997 ते 2002 आणि 2009 ते 2012
  8. VJTI बोर्ड मेंबर – 1997 ते 2002
  9. प्रिंस वेल्स म्युझियम बोर्ड मेंबर – 1997 ते 2002
  10. माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
  11. कार्याध्यक्ष – 1995 ते 2005
  12. अध्यक्ष – 2005 ते आजपर्यंत
  13. कार्याध्यक्ष – बौद्धजन सहाय्यक संघ. माझगाव ताडवाडी

संबंधित बातम्या:

यशवंत जाधवांचे दोन कोटींचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात, सोमय्यांच्या रडारवर शिवसेनेचे कोण कोण ?

2024 पर्यंत आम्हाला सहन करायचंय, स्थायी समिती अध्यक्षांच्या घरावरील आयकराच्या धाडीनंतर राऊतांचा सूचक इशारा

रेल्वे लगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन होणार?; जितेंद्र आव्हाडांनी केले प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.