संजय राऊत यांनी पोलिसांना का घेतले फैलावर, काय दिला सूचक इशारा

Sanjay Raut | मुंब्रा येथील शाखेच्या वादाचा पडसाद आता उमटत आहे. पोलिसांच्या कालच्या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी तोंडसूख घेतले. पोलिसांची काल हतबलता दिसून आले. ते कोणाचे संरक्षण करत होते आणि कोणाला संरक्षण देत होते यावरुन त्यांनी पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले.

संजय राऊत यांनी पोलिसांना का घेतले फैलावर, काय दिला सूचक इशारा
Follow us
| Updated on: Nov 12, 2023 | 10:51 AM

मुंबई | 12 नोव्हेंबर 2023 : मुंब्रामधील शाखा पाडल्याचा वाद काल चांगलाच पेटला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच या परिसराला भेट देण्याचे जाहीर केले होते. शनिवारी पोलिसांनी त्यांना या परिसात येण्यास मनाई केली होती. नंतर या भूमिकेपासून पोलिसांनी फारकत घेतली. संध्याकाळी ठाकरे या परिसरात पोहचले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पण पोलिसांनी त्यांना शाखास्थळापासून हाकेच्या अंतरावर अडवले. याविषयी संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि एक सूचक इशारा दिला.

काय म्हणाले राऊत

दिवाळीत राज्यातील वातावरण खराब होऊ नये. आम्हाला राज्याचं वातावरण बिघडवायचं नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण पोलिसांच्या भूमिकेवर त्यांना नाराजी व्यक्त केली. पोलिसांच्या भूमिकेवर त्यांनी चांगलेच तोंडसूख घेतले. काल पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना मुंब्रा येथील शाखा स्थळी येण्यास मनाई केली. कलम 144 अन्वये नोटीस बजावली होती. नंतर ती मागे घेण्यात आली. तसचे शाखा स्थळी जाण्यास प्रतिबंध केला होता.

हे सुद्धा वाचा

दरोडा घालणाऱ्यांनाच संरक्षण

आमच्या शाखांवर दरोडा घालणाऱ्यांनाचीच सुरक्षा पोलीस करत असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. आमची शाखा पाडली. त्यावर अतिक्रमण केले. पोलीस काल चोरांची सुरक्षा करत होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. काल पोलिसांची हतबलता आम्ही पाहिल्याचा टोला ही त्यांनी लगावला.

आणि दिला इशारा

काल पोलिसांनी चोरांची सुरक्षा केली. दरोडा घालणाऱ्यांच्या पाठिशी पोलीस होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला. पोलिसांच्या कालच्या एकूणच भूमिकेवर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांनी यावेळी एक सूचक इशारा पण दिला. 2024 मध्ये आम्ही सत्तेत असू आणि तुम्ही पण तुमच्या जागी असाल, असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.

आता कायदेशीर लढाई

आता या वादावर उद्धव ठाकरे गट कायदेशीर सामना करण्याच्या तयारीत आहे. शाखेचा वाद लवकरच हायकोर्टात पोहचणार आहे. ठाकरे गट याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्यामुळे मुंब्रा शाखेची लढाई आता अनेक दिवस चालणार हे निश्चित आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....