Shivsena: ‘राग आला तर गळाच आवळीन’, चंद्रकांत खैरे का संतापले गुलाबराव पाटलांवर? पाणीपुरवठा मंत्र्यांचं काय प्रत्युत्तर?

राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात शिवसेना कुणाची यावरुन संघर्ष सुरु आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येते आहे. तर शिवसेनाप्रमुख हे राष्ट्रपुरुष असल्याने त्यांची प्रतिमा किंवा विचार यावर कुणा एका कुटुंबाची मक्तेदारी असू शकत नाही, असे प्रत्युत्तर त्याला शिंदे गटाकडून देण्यात येते आहे. तर शिंदे गटावर सातत्याने गद्दार असल्याची टीका आदित्य ठाकरेंकडून आणि उद्धव ठाकरेंकडून करण्यात येते आहे. 

Shivsena: 'राग आला तर गळाच आवळीन', चंद्रकांत खैरे का संतापले गुलाबराव पाटलांवर? पाणीपुरवठा मंत्र्यांचं काय प्रत्युत्तर?
खैरेंना का आला राग? Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 6:15 PM

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्यावर टीका करणाऱ्या पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांचा गळा दाबीन, असे वक्तव्य औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)यांनी केले आहे. आपल्याला राग आला तर काहीही करु शकतो, असेही खैरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यावर नुकतीच गुलाबराव पाटील यांनी टीका केली होती. त्यावर खैरे संतापले आहेत. जे काय व्हायचं ते होईल, पण गुलाबराव यांना माफी मागायला लावीन, असा इशारा खैरे यांनी दिला आहे.

राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात शिवसेना कुणाची यावरुन संघर्ष सुरु आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येते आहे. तर शिवसेनाप्रमुख हे राष्ट्रपुरुष असल्याने त्यांची प्रतिमा किंवा विचार यावर कुणा एका कुटुंबाची मक्तेदारी असू शकत नाही, असे प्रत्युत्तर त्याला शिंदे गटाकडून देण्यात येते आहे. तर शिंदे गटावर सातत्याने गद्दार असल्याची टीका आदित्य ठाकरेंकडून आणि उद्धव ठाकरेंकडून करण्यात येते आहे.

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील ?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आदित्य ठाकरे होऊ शकतात, त्यांच्या विचारांचे वारसदार होऊ शकत नाहीत. त्यांनी बोलताना त्यांच्या वयाचा विचार करावा. आमच्या अनुभवाची विनाकारण खिल्ली उडवू नये. नाही तर आम्ही बोलण्यात कठीण आहोत, त्यांना आवरण अवघड होऊन जाईल, असा इशारा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. उद्धव ठाकरेंना आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण आदित्य ठाकरेंना आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही, अशी टीका गुलाबराव यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

खैरे यांच्या इशाऱ्यावर गुलाबरावांचे उत्तर

चंद्रकांत खैरे यांच्या या स्फोटक विधानानंतर या प्रकरणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली. त्यावर चंद्रकांत खैरे यांना आपला गळा का प्रिय आहे, असा टोला गुलाबराव पाटील यांनी मारला आहे. आपण जे म्हणालो ते खैरे यांनी नीट ऐकले तर ते आपल्याला गळ्याला लटकतील, गळाभेट घेतील असे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. त्यांनी आपण काय म्हटलो ते नीट ऐकावं असा सल्ला गुलाबरावांनी दिला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.