भाजपवाले जंगलात राहतात का? हे तर राक्षस गणातील लोक; संजय राऊतांची तोफ धडाडली
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या कारवाया केवळ महाविकास आघाडीतील लोकांवर होत आहेत. (why only action against maha vikas aghadi leader?, says sanjay raut)
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या कारवाया केवळ महाविकास आघाडीतील लोकांवर होत आहेत. भाजपवाले काय जंगलात राहतात का? असा सवाल करतानाच हे तर राक्षस गणातील लोक आहेत, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच कारवाई केली जात आहे. आम्हीही भाजपच्या नेत्यांची माहिती दिली आहे. त्यांच्यावर कारवाई का होत नाही? भाजपचे लोकं जंगलात राहतात का? ते कुठे राहतात? त्यांच्या काहीच प्रॉपर्टीज नाहीयेत? आणि त्या सर्व वैध मार्गाने गोळा केल्या आहेत का? आम्ही ईडीकडे काही माहिती दिली आहे. त्यांना अजून हात लागला नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यांची बायका मुले कुटुंब हे कुटुंबं आमचे काय रस्त्यावर आहेत. हे अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू केलं ना ते त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
इतरांचे नातेवाईक दिसत नाही का?
फक्त आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करणारे हे क्रुर लोकं आहेत. राक्षस गणातील लोकं आहेत. हे हिंदुत्वाचे नाव घेतात. पण हिंदुत्वाची व्याख्या अशी नाहीये. अटकासटका केल्या तरी सरकार पडणार नाही, असंही ते म्हणाले. कारवाईसाठी फक्त एकनाथ खडसेंचे नातेवाईक आणि नवाब मलिकांचे जावई दिसतात का? इतरांचे नातेवाईक का दिसत नाही?
तुरुंगातून आलेल्या भाजपच्या दहा नेत्यांचे नावा सांगेन
या महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध नाहीत. विविध तुरुंगातून शिक्षा भोगून आलेल्या भाजपच्या दहा नेत्यांची मी नावे सांगू शकतो. कोल्हापुरातून कोण आलं. चेंबूरमधून कोण आलं. अन्य ठिकाणाहून कोण आलं… कोण कोणती गँग चालवत होता. हे जर सांगायचं झालं तर माझ्या सारखा तज्ज्ञ माणून नाहीये यामध्ये, असा टोलाही त्यांनी लगावला.
संबंधित बातम्या:
2024 नंतर भेटू, तुमच्याही फायली तयार आहेत, तेव्हा भूमिगत होऊ नका; संजय राऊतांचा विरोधकांना इशारा
(why only action against maha vikas aghadi leader?, says sanjay raut)