मुंबईतील वॉर्डांच्या हद्दी ठरणार, निवडणूक आयोगाने मागवल्या हरकती आणि सूचना; आदेश जारी

मुंबई महापालिकेची निवडणूक (Municipal elections) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे निवडणुकांसदर्भातील कामाला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डाच्या हद्दी (Ward demarcation) ठरवण्यात येणार आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) एक परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे.

मुंबईतील वॉर्डांच्या हद्दी ठरणार, निवडणूक आयोगाने मागवल्या हरकती आणि सूचना; आदेश जारी
अबब..! उंदीर मारण्यासाठी मुंबई पालिकेने केले 1 कोटी खर्च
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 7:24 PM

मुंबई  :  महापालिकेची निवडणूक (Municipal elections) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे निवडणुकांसदर्भातील कामाला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डाच्या हद्दी (Ward demarcation) ठरवण्यात येणार आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) एक परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. निवडणुकांचे कामकाज विहीत कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रभागांच्या हद्दी निश्चित करण्याचा टप्पा महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी प्रभागाच्या भौगोलिक सीमाांची निश्चिती केली जाणार आहे. भौगोलिक सीमांची निश्चिती केल्यानंतर, त्यावर जर कोणाची सूचना किंवा हरकत असेल तर ती मागवण्यात येईल. त्यानंतर प्राप्त हरकतीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने या पत्रात दिली आहे. तसेच निवडणुकीच्या संदर्भांतील विविध टप्प्यावरील माहिती महापालिकेने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी असे देखील आयोगाने म्हटले आहे.

आयुक्तांवर जबाबदारी

या पत्रात पुढे म्हटले आहे की, निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कामांना सुरुवात झाली आहे. मात्र आरक्षणाच्या सोडतीपूर्वी भौगोलिक सीमांची निश्चिती होणे आवश्यक असते. त्यामुळे आता वार्डाच्या हद्दी ठरवण्यात येणार आहेत. त्यावरील हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. सर्व कामे ही ठरलेल्या वेळेत आणि नियोजनानुसारच पूर्ण होतील. या सर्वांची जबाबदारी ही महापालिका आयुक्तांची असणार आहे.

ठरलेल्या वेळेतच कामे पूर्ण करण्याच्या सूचना

दरम्यान केवळ वॉर्डाच्या हद्दी ठरवणेच नाही तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर महत्त्वाची कामे देखील ठरलेल्या वेळेतच पूर्ण व्हावीत. निवडणुकांसर्भातील सर्व कामांची माहिती महापालिकेने आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी अशा सूचना देखील राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. तसेच निवडणुकी संर्भातील कामे वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांची असणार आहेत.

संबंधित बातम्या

Wine in Maharashtra: किराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल; आठवलेंनी उडवली ठाकरे सरकारच्या निर्णयाची खिल्ली

महापालिका निवडणुकीसाठी ‘मनसे’ मैदानात; 2 फेब्रुवारीला रणनीतीवर काथ्याकूट, भाजपसोबत जाणार का?

राऊतांचं झिंग झिंग झिंगाट फडणवीसांच्या भीतीमुळं! नव्या वाईन धोरणावर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.