Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | मनोज जरांगेंना सदावर्ते रोखणार? हायकोर्टाने पाहा काय दिले आदेश
मनोज जरांगे पाटील आता पुण्याहून मुंबईच्या दिशेनं निघालेत. त्याआधी गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात गेले. आता जरांगेंना नोटीस बजावण्याचे आदेश हायकोर्टानं आझाद मैदान पोलिसांना दिलेत. पाहा टीव्ही 9 चा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मराठ्यांसह मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं कूच करतायत तर सदावर्ते हायकोर्टात गेले. सदावर्तेंच्या याचिकेवरुन सुनावणीही झाली. जरांगेंना आझाद मैदानाच्या क्षमतेची माहिती देताना नोटीस बजावण्याचे आदेश हायकोर्टानं पोलिसांना दिलेत. पुढच्या 2 दिवसांत मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा प्रचंड ताफा घेऊन मुंबईत येणार आहेत. त्याआधी गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात गेले. आता जरांगेंना नोटीस बजावण्याचे आदेश हायकोर्टानं आझाद मैदान पोलिसांना दिलेत. याचिकाकर्ते म्हणून सदावर्तेंनी स्वत: युक्तिवाद केला.
पाहा व्हिडीओ-
जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नसतानाही आंदोलन सुरु आहे वाहनांसह लाखोंच्या संख्येनं लोक मुंबईकडे येत आहेत 29 पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. 302 सारख्या 3 घटना घडल्या, अजून कुणाचंही नाव एफआयआरमध्ये नाही. मुंबई उच्च न्यायालयात जरांगेंना हजर राहण्यासाठी नोटीस द्या, असं सदावर्ते म्हणाले.
सरकारकडून महाधिवक्ते रविंद्र सराफांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की, सरकारकडे आंदोलनासाठी कुठलेही अधिकृत मागणीचं पत्र नाही. मुंबईत येण्याचा प्रयत्न केला तर मुंबईची परस्थिती बिघडू शकते. मराठा आंदोलकांनी मुंबईच्या बाहेर कुठेतरी आंदोलन करावं. आंदोलकाचा अधिकार मात्र, मुबलक जागी आंदोलन व्हावं. त्यावर न्यायमूर्ती अजय गडकरींनी सरकारला सवाल केला.
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आदेशाची गरज काय? त्यावर महाधिवक्ते म्हणालेत की, सरकारच्या अॅक्शनचा विपरीत परिणाम झाल्यास जबाबदारी कुणाची? न्यायमूर्तींनी म्हणालेत, सरकारनं रोड ब्लॉक होऊ नये याची खबरदारी घ्यावी. तसंच मनोज जरांगेंना नोटीस द्या, असे आदेशही आझाद मैदान पोलिसांना मुंबई हायकोर्टानं दिलेत.
इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा जरांगे पाटलांना आंदोलन थांबवण्याची विनंती केलीय. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देणार असून आंदोलन टाळा असं शिंदे म्हणालेत. जरांगे पाटील आता पुण्याहून मुंबईच्या दिशेनं निघालेत. पुढच्या काही तासांत मराठ्यांचा विराट मोर्चा, लोणावळ्याला असेल. अंतरवाली सराटीहून निघालेल्या मोर्चात आता असंख्य मराठे जोडले गेलेत. महामार्ग अक्षरश: भगवी झालीत.
विराट संख्येनं मराठा समाज रस्त्यावर उतरला असला तरी तितकीच शिस्तीचं दर्शन मराठ्यांनी घडवलंय. जरांगेंच्या एका हाकेवर, महाराष्ट्रातला मराठा कसा एकवटला हे दृश्यांतून स्पष्ट दिसतंय. रस्त्तेच्या रस्ते मराठे आणि त्यांच्या गाड्यांनी भरलीत. तर मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर कायदा करुन आरक्षण देणार, असा पुनवृच्चार मुख्यमंत्र्यांनी केलाय.
मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र अर्थात ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंची आहे. त्यासाठी जरांगे मुंबईच्या दिशेनं कूच करतायत. मात्र ओबीसी नेत्यांनी पुन्हा सरकारला इशारा दिलाय. आम्हीही 4 कोटींच्या संख्येनं मुंबईत येणार असं तायवाडे म्हणालेत. जरांगे मुंबईच्या जवळ येत आहेत.तर सदावर्ते कोर्टात गेल्यानं पोलिसांकडून त्यांना नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतर जरांगे नेमकी काय भूमिका घेतात याकडेही नजरा असतील.