Uddhav and Raj: उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चा, शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणतात…
पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना विचारणा केली असता, त्यांनी साद घातली तर येऊ देत, असे सांगत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. शिवसेनेने जर साद घातली तर याबाबत विचार करण्यात येईल, असे संकेतच त्यांनी या वक्तव्यातून दिल्याचे अर्थ काढण्यात येत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यालाही त्यांनी माध्यमांनी प्रश्न विचारलेला असताना शुभेच्छा आहेत, असे उत्तर दिले.
पुणे – राज्यात शिवसेनेत झालेली बंडाळी, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे आमदार, खासदार, त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर या सगळ्यात शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे एकाकी पडल्याचे दिसते आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray)हे पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या. याबाबत पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray)यांना विचारणा केली असता, त्यांनी साद घातली तर येऊ देत, असे सांगत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. शिवसेनेने जर साद घातली तर याबाबत विचार करण्यात येईल, असे संकेतच त्यांनी या वक्तव्यातून दिल्याचे अर्थ काढण्यात येत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यालाही त्यांनी माध्यमांनी प्रश्न विचारलेला असताना शुभेच्छा आहेत, असे उत्तर दिले. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले असले तरी साद घातली तर येूऊदेत, हे त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते आहे.
याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील- विनायक राऊत
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येऊ शकतील का, या चर्चांवर शर्मिला ठाकरे यांनी दिलेल्या या उत्तरानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांना सोलापुरात याबाबत विचारणा केली. त्यांनी याबाबतची कोणतीही चर्चा आपल्या कानावर नसल्याचे सांगितले खरे, मात्र याबाबतचे निर्णय करण्यास उद्धव ठाकरे सक्षम आहेत, असे सांगत त्यांनी ही शक्यता फेटाळलीही नाही. याबाबत राऊत म्हणाले की- शिवसेनेकडे अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जरी प्रस्ताव आला तरी याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे निर्णय घेतील. यापूर्वी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे राज ठाकरेना भेटले आहेत. त्यांना भेटून आम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मात्र असे असले तरी आम्हाला युतीबाबतचा काही प्रस्ताव आला तर त्याबाबत पक्षप्रमुख निश्चित विचार करतील.
राज ठाकरेंची शिंदेंच्या बंडाच्या काळात काय होती भूमिका?
राज ठाकरे यांनी मात्र या सगळ्या काळात शिवसेनेला सहानभूती घेण्याची भूमिका घेतली नाही. बंडाच्या काळात राज ठाकरे यांचे ऑपरेशन झाले होते. त्यावेळी त्यांनी या बंडाबाबत प्रतिक्रिया दिली नव्हती. बंडाच्या काळात एकनाथ शिंदे हे फोनवर राज ठाकरे यांच्याशी संपर्कात असल्याची माहिती होती. पक्षांतर बंदीचा कायदा लागू झाल्यास, हे सर्व आमदार राज ठाकरे यांच्या मनसेत जातील असेही सांगण्यात येत होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर, फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागले होते. त्यावर राज ठाकरे यांनी त्यांना लिहिलेले जाहीर पत्रही चर्चेत आले होते. त्यानंतर फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेटही झाली होती. यापूर्वीही टाळी देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंकडून योग्य प्रतिसाद आला नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता याबाबत काही घडामोडी होतील का, याबाबत साशंकता आहेच.