भरधाव कारने जॉगिंग करणाऱ्या महिला सीईओला हवेत भिरकावले, वरळी सी फेस येथील घटना

राजलक्ष्मी यांनी अलिकडेच टाटा मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. त्यांच्या टीशर्टवर रोनाल्ड रूक्स यांचे वाक्य लिहीलेले आहे, 'माझ्या जीवनाचे दिवस वाढावेत म्हणून मी धावत नाही, तर माझ्या आयुष्यात जीवन वाढावे म्हणून मी धावते आहे.'

भरधाव कारने जॉगिंग करणाऱ्या महिला सीईओला हवेत भिरकावले, वरळी सी फेस येथील घटना
CEO OF MUMBAIImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 6:14 PM

मुंबई : पुण्याच्या एका बड्या टेक्नो फर्मच्या 57 वर्षीय महिला सीईओ राजलक्ष्मी विजय यांचा भरधाव कारने धडक दिल्याने वरळी सी फेस परिसरात जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. राजलक्ष्मी विजय या वरळी सी फेसला जॉगिंग करीत असताना एका भरधाव टाटा निक्सॉन कारने त्यांना उडविले. या अपघातात राजलक्ष्मी विजय 20 फूट अंतरावर उडून निष्प्राण झाल्या. त्यांच्या मृत्यूनंतर मॅरेथॉन पटूंनी वरळी पोलीस ठाण्यावर निदर्शने केली आहेत. त्यांच्या मुलगा लंडनहून आल्यावर त्यांच्यावर अत्यसंस्कार होणार आहेत.

रविवारी सकाळी पाच वाजता राजलक्ष्मी त्यांच्या पती विजयसोबत रेसकोर्स येथे जॉगिंगला गेल्या होत्या. तेथे त्यांना त्यांचे इतर मित्र भेटले त्यांनी तेथे जॉगिंग आणि नेहमीप्रमाणे व्यायाम देखील केला. त्यांच्या नेहमीचे व्यायाम आणि कसरती संपल्यानंतर हे जोडपं नंतर रेसकोर्स येथून परत निघाले. त्यानंतर विजय पुन्हा पेडर रोडच्या दिशेने आणखीन जॉगिंग करण्यास निघाले तर राजलक्ष्मी यांनी घरी परतण्यापूर्वी मोठा लॉंग कट निवडत धावण्यास सुरूवात केली. त्यामुळे त्या वरळी सी फेसजवळ पोहचल्या.

राजलक्ष्मी वरळी सी फेस जवळ रस्त्याच्या डाव्या बाजूने धावत असताना सकाळी सहाच्या सुमारास एका टाटा निक्सॉन गाडीने त्यांना जबर धडक दिली. ही धडक इतकी वेगाने बसली की त्या अक्षरश: हवेत उडून 20 फूट अंतरावर जाऊन पडल्या. त्यामुळे गाडीचे नियंत्रण सुटून ही गाडी रोड डिवायडरला उजव्या बाजूने आदळली. त्यामुळे या कारच्या दोन्ही एअर बॅग्स उघडून चालक सुमेर मर्चंट याला थोडेफार जखमा झाल्या.

या प्रकरणात 23 वर्षीय सुमेर मर्चंट याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा भादंवि कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सुमेर याच्या घरी रात्री मित्रांची पार्टी झाली होती. त्यानंतर तो मित्राला सोडायला शिवाजी पार्क येथे गेला असता त्याने हा अपघात केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सुमेर मर्चंट हा ताडदेव येथे आपले पालक आणि धाकट्या भावासोबत रहात असून त्याचे पालक हिमाचल प्रदेशात गेल्याने त्याने आपल्या घरी मित्रासाठी पार्टी ठेवली होती. वाहन चालविताना सुमेर मर्चंट याने मद्यप्राशन केले होते का हे अजून कळलेले नसून त्याचे रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

राजलक्ष्मी या पुण्याच्या Altruist Technologies Private Limited या टेक्नो फर्मच्या सीईओ आहेत. त्या माटुंगा पूर्वेकडील बालाजी गार्डन टॉवर येथील सातव्या मजल्यावर राहतात, त्यांनी अलीकडेच टाटा मॅरेथॉनमध्येही भाग घेतला होता, त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. राजलक्ष्मी यांच्या डोक्याला प्रचंड जखमा झाल्याने त्यांच्या मृत्यू झाला. सुमेर याची कार घटनेप्रसंगी 100 किमीच्या वेगाने धावत होती तसेच त्याने मद्यधुंड अवस्थेत ही कार चालविल्याचा आरोप अपघात स्थळावरील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, वरळी पोलीस ठाण्यावर काही मॅरेथॉन पटूंनी निदर्शने केली आहेत.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.