Dharavi Corona | मुंबईला आणखी एक प्रशस्तीपत्र, WHO पाठोपाठ आणखी एका बड्या संस्थेकडून कौतुक

जागतिक बँकेने मुंबईतील धारावीमध्ये झालेल्या कोरोना नियंत्रणाच्या कामाचं कौतुक केलं आहे (World Bank praises corona prevention efforts in Mumbai's Dharavi).

Dharavi Corona | मुंबईला आणखी एक प्रशस्तीपत्र, WHO पाठोपाठ आणखी एका बड्या संस्थेकडून कौतुक
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 6:59 PM

वॉशिंग्टन : जागतिक बँकेने मुंबईतील धारावीमध्ये झालेल्या कोरोना नियंत्रणाच्या कामाचं कौतुक केलं आहे (World Bank praises corona prevention efforts in Mumbai’s Dharavi). जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीत लोकसहभाग, स्थानिक स्तरावरील उपाययोजना यांचा उपयोग करुन प्रभावीपणे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखल्याचं मत जागतिक बँकेने व्यक्त केलं आहे. जागतिक बँकेच्या एका अहवालात मुंबईतील कोरोना नियंत्रणाची विशेष दखल घेण्यात आली आहे.

धारावी झोपडपट्टी जवळपास 2.5 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसलेली असून या ठिकाणी 6 लाख 50 हजार नागरिक राहतात. गजबजाट आणि गर्दीतील झोपड्या, उघडी गटारं, अरुंद रस्ते अशा परिस्थितीत हे सर्व नागरिक येथे राहतात. अशी आव्हानं असतानाही या ठिकाणी प्रभावीपणे कोरोना नियंत्रणाचं काम झालं. यात सरकारी यंत्रणांसोबतच स्वयंसेवी संस्था, इतर स्वयंसेवक यांनी कोरोना नियंत्रण आणि नागरिकांना मदतीसाठी मोठी मेहनत घेतली आहे.

मुंबईत पहिला कोरोना रुग्ण 11 मार्च रोजी सापडला. त्या तुलनेत धारावीमध्ये 1 एप्रिलला म्हणजेच मुंबईतील कोरोना रुग्णानंतर 3 आठवड्यांनी आढळला. जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटलं, “जुलै 2020 पर्यंत 3 महिन्यांच्या काळात धारावीतील मे महिन्यातील रुग्णांच्या संख्येत 20 टक्क्यांनी घट झाली. या ठिकाणी व्यापक स्तरावर ताप आणि ऑक्सिजनची तपासणी करण्यात आली. त्यासाठी लोकप्रतिनिधींसह खासगी रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांनाही सहभागी करण्यात आले. यातून धारावीत कोरोना संसर्गांवर नियंत्रण करण्यात आले.”

धारावीतील गरीब कुटुंबांना लॉकडाऊनच्या काळात मदत करण्यासाठी अनेक फाऊंडेशन, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवक पुढे आले. त्यांनी या कुटुंबांना रेशन किट वाटल्या. अशाप्रकारे व्यापक प्रयत्नातून धारावीतील कोरोना नियंत्रणाच्या कामाला यश आल्याचं जागतिक बँकेने नमूद केलं आहे.

मंगळवारी (6 ऑक्टोबर) मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत नव्याने 22 रुग्णांची वाढ झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 3 हजार 280 इतकी झाली आहे. यापैकी 2 हजार 795 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या धारावीत केवळ 192 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या :

जगात पुन्हा मुंबई महापालिकेचा डंका, ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून धारावी पॅटर्नसह बीएमसीबद्दल गौरवोद्गार

सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लपवू नका, मोफत अँटिजेन टेस्ट करा, नवी मुंबई पालिका आयुक्तांचे आवाहन

Navi Mumbai Corona | कोरोनावर मात करण्यासाठी नवी मुंबईत ‘धारावी पॅटर्न’ लागू, आयुक्तांकडून प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा

World Bank praises corona prevention efforts in Mumbai’s Dharavi

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.