‘फडणवीस आणि ब्राह्मणांना 3 मिनिटांत संपवू’; व्हिडीओ शेअर करणारा युवक बारामतीचा, पोलिसांकडून अटक

मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर जरांगे यांच्या समर्थकाने फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हाटच व्हिडीओ शेअर करणाऱ्या योगेश सावंत याला अटक झाली आहे. या युवकाचा पत्ता बारामतीचा असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी सभागृहामध्ये केला.

'फडणवीस आणि ब्राह्मणांना 3 मिनिटांत संपवू'; व्हिडीओ शेअर करणारा युवक बारामतीचा, पोलिसांकडून अटक
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 7:55 PM

नवी मुंबई | मराठा आरक्षणाचे प्रमुख नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जरांंगे यांच्या या वक्तव्याचे पडसाद विधानसभेत उमटताना दिसले. भाजपच्या नेत्यांनी एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही मागणी मान्य करत चौकशीचे आदेश दिले होते. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडीओमधील वादग्रस्त वक्तव्य हे मनोज जरांगे यांच्या समर्थकाचं होतं. हाच व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे योगेश सावंत यांनी शेअर केला होता. त्यानंतर सावंत यांच्याविरोधात तक्रार झाली आणि पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आहे.

कोण आहेत योगेश सावंत?

योगेश सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जीवे मारण्याची धमकी देणे तसेच दोन समाजात त्वेष निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवसैनिक अक्षय पानवलकर यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला. पोलिसांनी नवी मुंबई परिसरातून योगेश सावंत यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

योगेश सावंत कार्यकर्ता म्हणत पवारांचा भाजपवर निशाणा

पोलिसांनी योगेश सावंतला पकडलं, त्याचा जबाब नोंदवला. एक दिवस पोलीस ठाण्यात ठेवलं आणि आज त्याला कोर्टात घेऊन चाललेत. भाजपने नाटकं करू नयेत, तो कार्यकर्ता आहे त्याने काय चूक केली. ज्या युट्यूब चॅनेलने मुलाखत घेतली, त्या चॅनेलवर कारवाई नाही ना ज्याने मुलाखत घेतली त्यावरही कारवाई नाही. कारवाई फक्त कार्यकर्त्यावरच करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.

आशिष शेलारांचा गंभीर आरोप

योगेश सावंत याला अटक केल्यावर रोहित पवार यांनी पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला फोन केला होता. योगेश सावंत याचा पत्ता बारामतीमधील असल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यागेश सावंतला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाकडून त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.