‘धोखे से मार देते हैं गीदड़ भी शेर को…’, बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशानची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

baba siddique zeeshan siddique: लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. या गँगच्या एका सदस्याने फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट केली. त्यात म्हटले की, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. कारण ते बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मदत करत होते. त्यांचे संबंध कथित अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सारख्या लोकांशी संबंध होते.

'धोखे से मार देते हैं गीदड़ भी शेर को...', बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशानची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
zeeshan siddique
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 8:43 PM

baba siddique zeeshan siddique: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडली. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दिकी याने या प्रकरणाचा तपासासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता त्यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, ‘बुज़दिल डराया करते है अक्सर दिलेर को, धोखे से मार देते हैं गीदड़ भी शेर को…’. झिशान यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

आमदार झिशान सिद्दिकी यापूर्वी म्हणाले होते की, गरीब आणि निष्पाप लोकांचे रक्षण करताना माझ्या वडिलांचे प्राण गेले. माझे कुटुंब दु:खी झाले आहे, पण त्यांच्या मृत्यूचे राजकारण करू नये. त्यांचे बलिदान नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे.

हे सुद्धा वाचा

नऊ जणांना अटक…

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आठवडाभरानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांना अटक केली आहे. एका आरोपीच्या फोनमध्ये त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी याचाही फोटो सापडला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील सूत्रधाराने स्नॅपचॅट ऍप्लिकेशनद्वारे झिशान सिद्दिकीचा फोटो शूटर्ससोबत शेअर केला होता. त्यानंतर शूटर्स आणि मास्टरमाइंड एकमेकांशी संवाद साधण्यासाठी स्नॅपचॅट या ॲप्लिकेशनचा वापर करत होते.

दसऱ्यानिमित्त फटाके फोडत असताना बाबा सिद्दिकी यांची कार्यालयाबाहेर त्यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी कार्यालयातून बाहेर येताच त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता.

लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. या गँगच्या एका सदस्याने फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट केली. त्यात म्हटले की, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. कारण ते बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मदत करत होते. त्यांचे संबंध कथित अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सारख्या लोकांशी संबंध होते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.