महत्वाची बातमी! मुंबईत गणपती विसर्जन करण्याचा प्लॅन करताय? 20 पेक्षा जास्त नियम लक्षात ठेवा, बीएमसीकडून जारी

गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाचा श्रीगणेशोत्सव देखील ‘कोविड 19’ या साथ रोगाच्‍या पार्श्‍वभूमीवर होत असल्याने हा उत्सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहन बृहन्‍मुंबई महापालिकेद्वारे नागरिकांना वेळोवेळी करण्‍यात आले. या आवाहनाला मुंबईकर नागरिक अत्‍यंत सकारात्‍मक प्रतिसाद देत आहेत.

महत्वाची बातमी! मुंबईत गणपती विसर्जन करण्याचा प्लॅन करताय? 20 पेक्षा जास्त नियम लक्षात ठेवा, बीएमसीकडून जारी
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 7:07 PM

मुंबईः श्रीगणेश चतुर्थीपासून घराघरात आणि मुंबईतील विविध परिसरात विराजमान झालेल्‍या आपल्‍या लाडक्‍या गणरायला आपण अनंत चतुर्दशी दिनी म्‍हणजेच 19 सप्‍टेंबर 2021 रोजी निरोप देणार आहोत. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाचा श्रीगणेशोत्सव देखील ‘कोविड 19’ या साथ रोगाच्‍या पार्श्‍वभूमीवर होत असल्याने हा उत्सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहन बृहन्‍मुंबई महापालिकेद्वारे नागरिकांना वेळोवेळी करण्‍यात आले. या आवाहनाला मुंबईकर नागरिक अत्‍यंत सकारात्‍मक प्रतिसाद देत आहेत.

मुंबईकरांच्‍या सेवेसाठी विविध ठिकाणी कर्तव्यार्थ उपस्थित असणार

येत्या रविवारी अनंत चतुर्दशीच्‍या निमित्ताने बृहन्‍मुंबई महापालिकेने श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी आवश्‍यक ती सर्व व्‍यवस्‍था महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली आहे. या व्यवस्थेंतर्गत महापालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये साधारणपणे 25 हजार इतक्या संख्येने संबंधित कामगार–कर्मचारी–अधिकारी हे मुंबईकरांच्‍या सेवेसाठी विविध ठिकाणी कर्तव्यार्थ उपस्थित असणार आहेत, अशी माहिती उप आयुक्त गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिली.

173 ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली

या अनुषंगाने अधिक माहिती देताना उप आयुक्त काळे यांनी सांगितले की, कोविडच्‍या पार्श्‍वभू‍मीवर गर्दी टाळण्‍यासाठी यंदा देखील बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. यानुसार 173 ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्‍थळे देखील कार्यरत असणार आहेत. या व्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 73 ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्‍थळे असून, याठिकाणी महापालिकेद्वारे आवश्यक ती व्यवस्था असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बृहन्‍मुंबई महानरगपालिकेद्वारे विविध सेवासुविधा उपलब्‍ध करून देण्यात येत आहेत.

सेवा-सुविधा व साधनसामुग्रींचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आली

यामध्‍ये प्रामुख्‍याने बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील चौपाट्यांसह विविध नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्‍थळी 715 जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्रकिना-यावरील भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नयेत, यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी 587 ‘स्टील प्लेट’ची व्‍यवस्‍था करुन तात्पुरते वाहन मार्ग तयार करण्यात आलेत. याचबरोबर विविध 338 निर्माल्य कलश, 182 निर्माल्य वाहन, 185 नियंत्रण कक्ष, 144 प्राथमिक उपचार केंद्र, 39 रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली. या व्यतिरिक्त 145 स्वागतकक्ष, 84 तात्पुरती शौचालये, 3 हजार 707 फ्लड लाईट, 116 सर्च लाईट, 48 निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी 36 मोटर बोट व 30 जर्मन तराफा इत्‍यादी सेवा-सुविधा व साधनसामुग्रींचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी संरक्षण कठडयांच्या व्‍यवस्‍थेसह विद्युत व्यवस्था देखील आवश्यकतेनुसार करण्‍यात आली आहे.

महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे :-

• सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार / फुले इ. चा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल, याची दक्षता घ्‍यावी. तसेच घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणा-यांनी देखील याबाबत दक्षता घ्यावी. • घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे. • गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या-घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी देखील नजीकच्‍या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावे. • घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त 5 व्‍यक्‍ती असाव्‍यात. शक्‍यतोवर या व्‍यक्तींनी ‘कोविड-19’ या रोगाच्‍या लसीकरणचे 2 डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेऊन 15 दिवस झालेले असावेत. • घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेऊ नयेत. • विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्‍क / शिल्‍ड इ. स्‍वसंरक्षणाची साधने काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावी. • शक्यतोवर लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाऊ नये. • सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाच्‍यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील त्‍यांनी मास्‍क वापरावे आणि सामाजिक अंतर पाळावे. तसेच सदर 10 व्‍यक्तींनी शक्‍यतो ‘कोविड-19’ या रोगाच्‍या लसीकरणचे 2 डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेऊन 15 दिवस झालेले असावेत. तसेच कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येवू नये. • सार्वजनिक गणशोत्‍सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्‍थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्‍यंत धीम्‍या गतीने नेऊ नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्‍य गतीने वाहन विसर्जन स्‍थळी घेवून जावे. विसर्जना दरम्‍यान वाहन थांबवून रस्‍त्‍यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेवू देण्‍यास / पूजा करुन देण्‍यास सक्‍त मनाई आहे. • सन 2021 च्या गणेशोत्‍सवा दरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी. • मुंबई शहरात एकूण 73 नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. तेथे महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. त्‍यांजकडे गणेशमूर्ती देण्‍यात यावी. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे. • नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या 24 विभागांमध्‍ये सुमारे 173 ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणा-या भाविकांनी शक्‍यतोवर सदर कृत्रिम तलावाचा वापर करावा. • महापालिकेच्‍या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत. • मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे. • विसर्जना दरम्‍यान सामाजिक दूरीकरण अंतर (social distancing), मास्‍क / मुखपट्टी, सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. • प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्‍ये असणा-या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सील्‍ड इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीच्‍या विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी. • घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे. • बृहन्‍मुंबई महानगरपालिका / पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे. • उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल. अन्यथा कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जनस्‍थळी सर्व ती व्‍यवस्‍था केली असून मुंबईकर गणेशभक्‍त नागरिकांनी कोविड या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेऊन श्रीगणरायाला भावपूर्ण निरोप द्यावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

सरकारकडून निर्यातदारांना गिफ्ट, 31 डिसेंबरपर्यंत प्रलंबित कर परताव्यासाठी करता येणार अर्ज

रेल्वे कौशल्य विकास योजना सुरू, हजारो लोकांना लाभ मिळणार, जाणून घ्या

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.