अंगावर हिजाब, खाद्यांवर भगवा, राम मंदिरासाठी मुस्लिम युवती पायीवारी करत मुंबईवरुन अयोध्याकडे
shabnam shaikh mumbai to ayodhya walk for ram mandir | रामाच्या भक्तीत लीन झालेली मुस्लिम तरुणी मुंबईवरुन अयोध्याला पायी वारी करत निघाली आहे. सुमारे 1,500 किलो मीटरचे अंतर ती आपल्या दोन मित्रांसोबत गाठणार आहे. अयोध्येत जाऊन भगवान रामाचे दर्शन घेणार आहे.
चैतन्य गायकवाड, नाशिक, दि.25 डिसेंबर | खांद्यावर भगवा ध्वज, पाठीवर राम मंदिराचा फोटो आणि अंगावर हिजाब परिधान केलेली युवती शबनम आहे. रामाच्या भक्तीत लीन झालेली ही तरुणी मुंबईवरुन अयोध्याला निघाली आहे. सुमारे 1,500 किलो मीटरचे अंतर ती आपल्या दोन मित्रांसोबत गाठणार आहे. अयोध्यात प्रभूरामाचे दर्शन घेणार आहे. मुंबईवरुन पायी जाणाऱ्या या शबनम शेख हिला पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. आतापर्यंत शबनम अडीचशे किलोमीटर अंतर कापून नाशिकमध्ये आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेळ दिल्यास आपण त्यांची भेट घेणार असल्याचे शबनम हिने सांगितले.
राज्य सरकारने दिला पोलीस बंदोबस्त
शबनम हिला रामललाचे दर्शन करायचे आहे. स्वत:ला ती सनातनी मुस्लिम म्हणत आहे. तिच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने तीन महिला पोलीस दिले आहेत. लहाणपणापासून शबनमला रामायणाची गोडी लागली. महाभारत धारवाहिक तिने पूर्ण पाहिली आहे. रामायण आणि महाभारताचा तिच्या जीवनावर खूप प्रभाव पडला. ती प्रभू रामाला आपले आदर्श मानते. तिच्या या अयोध्या यात्रेला घरच्या लोकांनीही प्रोत्साहन दिले. अयोध्येत प्रभू रामाचे दर्शन घेऊन अयोध्येतील धन्नीपूर येथे तयार होत असलेल्या मशिदीत ती जाणार आहे. यामाध्यमातून आपली दोन्ही धर्मात आस्था असल्याचा संदेश ती देणार आहे.
दोन मित्रांसह निघाली पायी वारीला
अयोध्या येथे २२ जानेवारीला प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शबनम आपल्या दोन मित्रांसह मुंबई येथून पायी निघाली आहे. तिच्यासोबत रमनराज शर्मा आणि बिनित पांडे असे तिचे दोन मित्र आहे. रामायण बाबत आणि प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आपणास खूप आस्था असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. त्याचप्रमाणे अयोध्या येथे जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची आपली महत्वकांक्षा असल्याचे शबनमने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने आपण प्रेरीत झाल्याचे शबनम हिने सांगितले.