किमत तो देखो… बरेली ‘राधा’ ची सारंगखेडात चर्चा; घोडीची कोट्यावधीची किंमत ऐकून सारेच अवाक
Sarangkheda Ghode Bazar Radha Ghodi Price : किमत तो देखो... नंदुरबारच्या सारंगखेडामधील घोडे बाजारात महागडे घोडे येण्यास सुरवात झालीय. उत्तर प्रदेशच्या बरेलीतून आलेल्या राधाची चर्चा सर्वत्र चर्चा होतेय. राधाची किंमत ऐकून तुम्ही पण थक्क होणार आहात.
जितेंद्रकुमार बैसानी, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, सारंगखेडा, नंदुरबार : 22 डिसेंबर 2023 | एखाद्या घोडेबाजारात एखाद्या घोडीची किंमत किती असू शकते? आपण फार-फार तर लाखोंची किंमत गृहित धरतो. मात्र नंदुरबारच्या सारंगखेडातील बाजारात आलेल्या एका घोडीची किंमत ऐकून तुम्ही अवाक व्हाल. सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेल्या उत्तर प्रदेश येथील बरेली येथील राधा घोडीची चर्चा आहे. तिची अदा, तिचं सौंदर्य ,तिची चाल तिचा रूबाब अनेकांना भावला.घोड्याची उंची आणि त्याच्या सौंदर्यावर तिच्या जातींवर किमती ठरत असतात. यावर्षी घोडे बाजारात अनेक किमती घोडे दाखल होण्यास सुरवात झाली आहे. सर्वात महाग असलेल्या राधा घोडीची किंमत पाहून डोळे विस्फारतील…
किंमत किती?
उत्तर प्रदेशातून आलेल्या राधा या घोडीची किंमत 10 लाख नाही. 15 लाख नाही. तर तिची किंमत 1 कोटी आहे. आतापर्यंत 70 लाखापर्यंत तिची बोली लागली आहे. मात्र मालकाला हि घोडी विक्री करायची नाही कारण ती जातिवंत असल्याने ती त्यांच्या अश्वशाळेत अश्वपैदास करण्यासाठी आहे.
‘राधा’ चा खुराक काय?
उत्तर प्रदेश मधील बरेली येथील नजीम भाई यांचा आर एस अश्व शाळेतील असून, तिची उंची ७२ इंच इतकी आहे देश भरात होणाऱ्या अश्व स्पर्धा साठी ती जात असते, देशातील सर्वात उंच घोडी असल्याचा त्यांचा दावा त्यांनी केला आहे. हि मारवाड जातीची असून पांढरी शुभ्र आहे तिच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जात आसते. तिला दिवसाला 7 लिटर दुध तसेच मका, राईचे तेल बदाम गावरान अंडी दिले जात असतात. तिची देखभाल करण्यासाटी 4 जण तैनात असतात.
राधा घोडीच्या सोबतच बाजारात अजून काही आकर्षक अश्व दाखल झाले आहेत त्यात मध्यप्रदेश मधील उज्जैन येथील दीपक यांच्या मालकीच्या गब्बर घोड्याची पंजाब मध्ये असणाऱ्या घोड्याचा नुकरा जातीतून येतो याची किमत मालकाने 11 लाख ठेवली आहे. आपल्याला हि घोड्यांच्या वेग वेगळ्या आदा त्यांचा रुबाब आणि वेगाचा थरार अनुभवाचा असेल तर आपल्याला सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल भेट द्यावी लागेल.