Nagar Panchayat Election result 2022 : निफाडमध्ये शिवसेना; सुरगाणा, देवळा नगरपंचायती भाजपकडे

निफाड नगरपंचायतीमध्ये मात्र शिवसेनेच्या वाघाने डरकाळी फोडली आहे. नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी मतदान झाले. त्यापैकी सात जागा या शिवसेनेने पटकावल्या आहेत.

Nagar Panchayat Election result 2022 : निफाडमध्ये शिवसेना; सुरगाणा, देवळा नगरपंचायती भाजपकडे
सेनेचा भाजपशी घरोबा
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 11:52 AM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत सुरगाणा आणि देवळा नगरपंचायतीवर भाजपने (BJP) सत्ता मिळवली आहे, तर निफाडमध्ये 17 पैकी 7 जागा मिळवून शिवसेना (Shiv Sena) नंबर एकवर आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना सत्तेत येऊ शकते. जिल्हात एकूण सहा नगरपंचायतीसाठी निवडणूक होत असून, दिंडोरीत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी 17 पैकी 6 जागा मिळवून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस येथे एकत्र आले, तर सहजपणे महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. विशेष म्हणजे दिंडोरी हा डॉ. भारती पवार यांचा लोकसभा मतदार संघ असून, त्यांचे येथे मजबूत जाळे आहे.

येथे कमळ फुलले…

सुरगाणा नगरपंचायतीमध्ये एकूण 17 जागा आहेत. या ठिकाणी सर्वाधिक आठ जागा मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेनेने सहा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा मिळवली आहे. देवळा येथेही भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. या ठिकाणी एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी 15 जागा भाजपने मिळवल्या आहेत, तर अवघ्या दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. एकंदर या दोन्ही नगरपंचायतीमध्ये भाजची सत्ता येण्याचा मार्ग अतिशय सुकर आहे.

येथे वाघाची डरकाळी…

निफाड नगरपंचायतीमध्ये मात्र शिवसेनेच्या वाघाने डरकाळी फोडली आहे. नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी मतदान झाले. त्यापैकी सात जागा या शिवसेनेने पटकावल्या आहेत. शहर विकास आघाडीने चार जागा पटकावल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर बसप आणि इतरांना प्रत्येकी एकेक जागा मिळाली आहे. मात्र, या ठिकाणी शिवसेना सहजपणे सत्तेत येऊ शकते हे नक्की.

सुरगाणा नगरपंचायत

– एकूण जागा – 17

– भाजप – 08

– शिवसेना – 06

– माकप – 02

– राष्ट्रवादी काँग्रेस – 01

देवळा नगरपंचायत

– एकूण जागा – 17

– भाजप – 15

– राष्ट्रवादीला – 2

निफाड नगरपंचायत

– एकूण जागा – 17

– शिवसेना- 07

– शहर विकास आघाडी – 04

– राष्ट्रवादी काँग्रेस- 03

– काँग्रेस – 01

– बसपा- 01

– इतर (अपक्ष )- 01

इतर बातम्याः

Nashik | नाशिकमध्ये कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवली का; बळींच्या रेकॉर्डमध्ये पावणेतीन हजारांची भर कशी?

Nashik | लोकशाहीवरील अढळ निष्ठेसाठी विविध कार्यक्रम, जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व संस्थांना सूचना काय?

Agri | वायदे बाजार बंदी हटवा, जीएम तंत्रज्ञानाला परवानगी द्या; स्वतंत्र भारत पक्षाचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.