याच त्या नगरपंचायती जिथल्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होतील, 21 डिसेंबर ऐतिहासिक ठरणार!
32 जिल्ह्यात 102 नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. तर 7 नगरपरिषदा / नगरपंचायतीसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. त्यात दोन जिल्हा परिषदांचाही समावेश आहे, त्याअंतर्गत येणाऱ्या 15 नगरपंचायतींनाही याचा फटका बसणार आहे.
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर राज्यात तब्बल 32 जिल्ह्यात ओबीसी आरक्षण नसल्याचा फटका बसणार आहे. कारण 32 जिल्ह्यात 102 नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. तर 7 नगरपरिषदा / नगरपंचायतीसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. त्यात दोन जिल्हा परिषदांचाही समावेश आहे, त्याअंतर्गत येणाऱ्या 15 नगरपंचायतींनाही याचा फटका बसणार आहे. फक्त नगरपंचायतीच नाही तर 5 महानगरपालिकेतही एकेका जागेसाठी 21 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारपुढे सर्वात मोठा पेच तयार झाला आहे.
ओबीसी आरक्षण नसल्याचा या गावांना जास्त फटका
ठाणे जिल्हा- शहापूर, मुरबाड, पालघर, मोखाडा ,विक्रमगड, लालसरी . रायगड- तळा, खालापूर, मानगाव, कोल्हापूर-म्हसळा, पाली, रत्नागिरी-दापोली, मंडणगड, सिंधूदुर्ग – वैभववाडी, दोडामार्ग-कसई, कुडाळ, पूणे जिल्हा -देहू, सातारा जिल्हा- दहवडी, वडूज, खंडाळा, पाटण, लोणंद, कोरेगाव, सांगली जिल्हा-कवठेमहंकाळ, खानापूर, कडेगाव, सोलापूर जिल्हा-महाळूंग, श्रीपूर, माळशिरस, माढा, वैराग, नातेपुते, नाशिक जिल्हा-कळवण, सुरगणा, देवळा, पेट, निफाड, धूळे जिल्हा- साक्री, नंदूरबार जिल्हा- धडगाव-वडफळ्या-रोशनमाळ, अहमदनगर जिल्हा-कर्जत, अकोले, पारनेर, शिर्डी, जळगाव जिल्हा-बोधवड, औरंगाबाद जिल्हा-सोयगाव, यवतमाळ जिल्हा-महागाव, कळंब, बाभूळगाव, राळेगाव,जामनी, झरी, मारेगाव, बुलडाणा जिल्हा-संग्रामपूर, मोताळा, अमरावती जिल्हा- तिवसा, भातुकली, हिंगोली जिल्हा-औंढा-नागनाथ, सेनगाव, नांदेड जिल्हा-माहूर, अर्धापूर, नायगाव, उस्मानाबाद जिल्हा-लोहारा बु. वाशी, लातूर जिल्हा-शिरुर अनंतपाळ, देवणी, चाकूर, जळकोट, बीड जिल्हा- शिरूर कासार, केज, आष्टी, पाटोदा, वडवणी, परभणी जिल्हा-पालम, जालना जिल्हा, जाफराबाद, मंठा, घनसावंगी, तिर्थपूरी,बदनापूर वाशिम जिल्हा- मनोरा, भंडारा जिल्हा-लाखांदूर, लाखनी, मोहाडी, वर्धा जिल्हा-समुद्रपूर, आष्टी, कारंजा, सेलू, नागपूर जिल्हा-हिंगणा, कुही, गोंदिया जिल्हा,सावली,अर्जूनी, देवरी, सड-अर्जूनी, गडचिरोली जिल्हा- भामरागड, कुरखेडा, धानोरा, सिरोंचा, चामोर्शी, अहेरी, कोर्ची, एटापल्ली, चंद्रपूर जिल्हा-कोंभूर्णा, गोंड पिंपरी, कोरपणा, जिवती, मुलचेरा, शिंदेवाही लोणवाही.
पोटनिवडणुका 7 ठिकाणी-नगरपरिषद/ नगरपंचायत शिरोळ – 6 अ जत – 5 ब नागभीड- 4 अ सिल्लोड- 12 अ वानाडोंगरी- 6 अ फुलंब्री- 2 आणि 8 ढाणकी- 12 आणि 13
या गावांना आणि नगरपंचायती, नगरपरिषदांना या निकालाचा मोठा फटका बसणार आहे.