Corona Hospital Fire : नागपुरात कोरोना रुग्ण असलेल्या हॉस्पिटलला आग, तिघांचा मृत्यू!
आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळतेय.
नागपूर : नागपुरातील वेल ट्रीट या कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडलीय. या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्यानंतर तिथे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. मात्र या आगीत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर काहीजण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. (fire at the Well Treat Hospital in Nagpur, Corona moved the patients to another place, no casualties)
27 रुग्णांना दुसरीकडे हलवलं
वेल ट्रीट हे एकूण 30 बेडचं रुग्णालय आहे. 3 रुग्णांना सकाळी डिस्चार्ज देण्यात आला होता. 27 रुग्णांना आता रुग्णवाहिकेतून दुसरीकडे उपचारासाठी नेण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही आग रुग्णालयातील एसीला लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. आग लागल्यानंतर काही काळ रुग्णालय परिसरात मोठी अफरातफर माजली.
Three dead bodies have been brought to Government Medical College & Hospital: Dr Avinash Gawande, Medical Superintendent, GMC, Nagpur
— ANI (@ANI) April 9, 2021
रुग्णालयातील 27 रुग्णांना अन्य रुग्णालयात उपाचारासाठी हलवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत आता आम्ही काही सांगू शकत नाहीत. पण संपूर्ण रुग्णालयाची पाहणी सुरु असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.
भांडूपमधील रुग्णालयाला आग, 10 रुग्णांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी मुंबईतील भांडूपमधल्या एका मॉलमधील रुग्णालायाला भीषण आग लागली होती. त्या आगीत होरपळून 10 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या रुग्णालयाच्या परवानगीवरुन जोरदार राजकारणही रंगलं होतं. दरम्यान या मॉलला लागलेली आग तब्बल 11 तासांनी आटोक्यात आणली होती. या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले होते.
संबंधित बातम्या :
धक्कादायक, नातेवाईकांची 48 तास बेडसाठी धावाधाव, अखेर बेड मिळाला पण 15 मिनिटात जीव गेला
तब्बल 25 कोरोनाबाधित महिलांचे सीझेरियन, नागपुरातील डॉक्टर दंदेंचा पुढाकार
fire at the Well Treat Hospital in Nagpur, Corona moved the patients to another place, no casualties